'गटारी पार्ट्या' : 'कोणाही एका राजकीय जेवणाच्या खर्चात आदिवासींच्या लेकरांसाठी साकव बनले असते'; वाचा, मोरोशी - फांगुळगव्हाण साकव प्रकरणी सोशियल मीडियावर नेटकऱ्यांच्या संताप...
ठाणे/मुरबाड (दि. ०५) : (किशोर गायकवाड) तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधावांच्या व्यथा मांडणारी बातमी काल शब्द मशालने प्रसारित करताच त्यावर वाचकांकडून अनेक प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत.
Feast Program of NCP (AP) |
Feast Program of Shivsena (Shinde) |
मोरोशी आश्रमशाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या सुमारे ७० ते ८० विध्यार्थ्यांसाठी स्थानिक आदिवासी बांधवांनी स्वकष्टातून साकव उभारल्याची वार्ता काल शब्द मशालने प्रसारित केली होती. याबाबत अनेक जागृत वाचकांनी सूचक, आंबट, तिखट तथा खोचक तसेच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Feast Program of NCP (SP) |
Meeting of the Congress (I) Party in Murbad one Day Before |
मुळात, ज्यादिवशी हे आदिवासी बांधव एकीकडे ओढ्याच्या वाहत्या पाण्यात उतरून आपल्या लेकरांसाठी दगडगोटे आणि काठ्यांपासून साकवाचे बुरुज उभारत होते, त्याचवेळी दुसरीकडे हाकेच्या अंतरावर ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या विधानसभा मोर्चे बांधणीकामी आयोजित जेवणावळींचा नेते-पुढाऱ्यांकडून फडशा पाडला जात होता.
मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) माळशेज घाट (Malshej Ghat) माथ्यावरील हॉटेल राजगड येथे शिवसेना शिंदे गटाच्या सुभाष पवार (Subhash Pawar) यांचा तर एमटीडीसी रिसॉर्ट येथे राष्ट्रवादी (NCP AP) पक्षाच्या प्रमोद हिंदुराव (Pramod Hindurao) यांचा मेजवानी कार्यक्रम सुरू होता. तसेच मुरबाड शहरातील शिवनेरी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी (NCP SP) पक्षाचा देखील त्याचवेळी स्नेहभोजन सुरू होता तर आधीच्या दिवशी याच ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत कोंग्रेस (Murbad Congress) पक्षाचा ही मेळावा झाला होता.
मात्र, 'कोणाही एका राजकीय जेवणावळीच्या खर्चात या आदिवासींच्या लेकरांसाठी पक्के साकव बनले असते' अशा सूचक प्रतिक्रिया चिकित्सक वाचक वर्गाकडून व्यक्त केल्या जात असून यावर मुरबाडचे धनधांडगे राजकारणी काय स्पष्टीकरण देतील? हे पाहणे विशेष ठरेल.
तर शब्द मशालच्या या (Shabd Mashal) बेधडक बातमीचे अनेकांनी कौतुक केले असून प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचेवर संताप व नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात या दुर्गम भागातील विद्यार्थी तसेच कष्टकरी, उपेक्षित भारतीय नागरिकांना अर्थात मुरबाडच्या आदिवासी बांधवांना अद्याप किती संकटांना तोंड देऊन जगण्यासाठी तडजोड करावी लागेल? असा निरुत्तरीत सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
0 Comments