![]() |
Murbad City Traffic Control |
न्यूज इम्पॅक्ट : ...आणि म्हणून 'त्या' दिवशी शहरात वाहतूक कोंडी टळली; पोलिसांचे ही कौतुक... वाचा
-Kishor K. Gaikwad, Murbad
ठाणे/मुरबाड (दि. २९) : (किशोर गायकवाड) मुरबाड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक रणधुमाळीचा विपरीत परिणाम मुरबाड शहराच्या वाहतुकीवर होऊन शहवासीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बातमी शब्द मशालने प्रसारित केली होती. त्याअनुषंगाने प्रसारित बातमीची दखल घेऊन निवडणुकीच्या नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुरबाड शहरातील वाहतुकीवर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून आले.
मुरबाड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे सततच्या वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीतील उमेदवार किसन कथोरे उमेदवारी अर्ज दाखल दिनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे प्रवासी, शहरवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याची नोंद घेऊन शब्द मशालने याबाबत वृत्त प्रसारित करून मतदारांची ठोस उपाययोजची मागणी मांडली होती.
त्यानुसार दि. २९ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आलेल्या १२ उमेदवारी अर्जांतील राष्ट्रवादी एस. पी. पक्षाचे सुभाष पवार यांनी भव्य शक्तिप्रदर्शन केले होते. यामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी खबरदारी म्हणून शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एमआयडीसी मार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग मोकळा राहून वाहतूक कोंडीवर प्रवासी तसेचशहरवासीयांना तूर्तास दिलासा मिळाला. तर त्रस्त नागरिकांच्या व्यथा आपल्या बातमीपत्रातून मांडल्या बद्दल अनेकांनी शब्द मशालचे आभार मानले आहे. तर दक्ष भूमिका बजावल्या बद्दल वरिष्ठ पोलिस कर्मचारी किशोर सुरवाडे व त्यांच्या टीमचे ही कौतुक होत आहे.
-Kishor K. Gaikwad, Murbad
(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)
0 Comments