ग्रीन सिग्नल : ४५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत सुभाष पवार; शरद पवारांचे मुरबाडकडे विशेष लक्ष, भाजपा उमेदवाराचे टेंशन वाढणार? पुढील प्रयोग कोणता? वाचा... -Kishor Gaikwad, Murbad

ग्रीन सिग्नल : ४५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत सुभाष पवार; शरद पवारांचे मुरबाडकडे विशेष लक्ष, भाजपा उमेदवाराचे टेंशन वाढणार? पुढील प्रयोग कोणता? वाचा...


-Kishor Gaikwad, Murbad

ठाणे/मुरबाड विधानसभा (दि. २४) : (किशोर गायकवाड) अवघ्या ठाणे जिल्ह्याचा लक्ष वेधलेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या सुभाष यांना देखील ग्रीन सिग्नल मिळाला आहे. 


 राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (Rashtrawadi Congress Sharadchandra Pawar Party) बहुप्रतिक्षित पहिली उमेदवार यादी नुकताच जाहीर झाली असून यात ३२ व्या क्रमांकावर सुभाष पवार यांचे नाव नमूद आहे. त्यामुळे खुद्द आघाडी श्रेष्ठी देखील मुरबाड विधानसभेबाबत गंभीर भूमिकेत असल्याचे दिसत आहेत. तर सूत्रांच्या माहितीनुसार मविआ नेते शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) स्वतः मुरबाडमध्ये उपस्थित राहून प्रचारसभा गाजविणार असल्याचे समजले आहे. त्यामुळे मुरबाडची विधानसभा निवडणूक दस्तुरखुद्द शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याचे यातून सिद्ध होत असून यंदा मुरबाड मतदारसंघात राजकीय खडाजंगी पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.


 तर केवळ किसन कथोरेंना (Kisan Kathore) पराभूत करण्यासाठी पक्षांतर करून विधानसभा निवडणूकीच्या रणांगणात उतरलेले सुभाष पवार आपल्या वडिलांच्या पराजयचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच शरद पवारांचा मुरबाड मतदारसंघावर अधिक लक्ष असल्याने भाजपाला ही निवडणूक सोपी नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येणाऱ्या रणधुमाळीत कोणकोणते नवनवीन राजकीय प्रयोग पाहायला मिळतील? याबाबत तर्क लावला जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली उमेदवार यादी

1) इस्लामपूर – जयंत पाटील
2) काटोल – अनिल देशमुख 3) घनसावंगी – राजेश टोपे 4) कराड उत्तर – बाळासाहेब पाटील 5) मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड 6) कोरेगाव – शशिकांत शिंदे 7) बसमत – जयप्रकाश दांडेगावकर 8) जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर 9) इंदापूर – हर्षवर्धन पाटील 10) राहुरी – प्राजक्त तनपुरे 11) शिरुर – अशोक पवार 12) शिराळा – मासिंगराव नाईक 13) विक्रमगड – सुनील भुसारा 14) कर्जत – जामखेड – रोहित पवार 15) अहमदपूर – विनायकराव पाटील 16) सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे 17) उदगीर – सुधाकर भालेराव 18) भोकरदन – चंद्रकांत दानवे 19) तुमसर – चरण वाघमारे 20) किनवट – प्रदीप नाईक 21) जिंतूर – विजय भामरे 22) केज – पृथ्वीराज साठे 23) बेलापूर – संदीप नाईक 24) वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे 25) जामनेर – दिलीप खोडपे 26) मुक्ताईनगर – रोहिणी खडसे 27) मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे 28) नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे 29) किरोडा – रविकांत गोपचे 30) अहिरी – भाग्यश्री आत्राम 31) बदनापूर – बबलू चौधरी 32) मुरबाड – सुभाष पवार 33) घाटकोपर पूर्व – राखी जाधव 34) आंबेगाव – देवदत्त निकम 35) बारामती – युगेंद्र पवार 36) कोपरगाव – संदीप वरपे 37) शेवगाव – प्रताप ढाकणे 38) पारनेर – राणी लंके 39) आष्टी – मेहबूब शेख 40) करमाळा – नारायण पाटील 41) सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे 42) चिपळूण – प्रशांत यादव 43) कागल – समरजीत घाटगे 44) तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील 45) हडपसर – प्रशांत जगताप




(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-किशोर गायकवाड, मुरबाड

वाचा...













Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments