उमेदवारांच्या प्रचार प्रक्रियेमुळे मुरबाड शहराच्या वाहतूक कोंडीत वाढ; उपाययोजना आखण्याची नागरिकांची मागणी... -Kishor Gaikwad

Traffic in Murbad City

उमेदवारांच्या प्रचार प्रक्रियेमुळे मुरबाड शहराच्या वाहतूक कोंडीत वाढ;


उपाययोजना आखण्याची नागरिकांची मागणी...


ठाणे/मुरबाड शहर (दि. २४) : (किशोर गायकवाड) मुरबाड शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून सद्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेने त्यात चांगलीच भर टाकलेली पाहायला मिळत आहे.

 राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर मुरबाड विधानसभेचा निवडणूक विभाग चांगलाच कामाला लागलेला पाहायला मिळत आहे. शहरातील तहसिलदार कार्यालयातून विधानसभेचा कारभार चालविला जात असल्याने सुरक्षेची उपयोजना म्हणून तहसिल कार्यालच्या चौतर्फा वाहनांच्या रहदारीला बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच ब्रिजच्या संथ कामाने त्रस्त असलेल्या मुरबाड शहरवासीयांना आता प्रशासनाच्या अनियोजितपणामुळे भीषण वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. 

 मात्र गुरुवारी या वाहतूक कोंडीने शहरात उच्चांक गाठलेला पाहायला मिळाला. भाजपा उमेदवार किसन कथोरे यांचे नामनिर्देशन फॉर्म दाखल करण्यासाठी शहरात कार्यकर्ते दाखल होत असतांना शहरातील राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला एमआयडीसीमार्गे वळविण्यात आले होते. त्यातच एमआयडीसी क्षेत्रातील तहसिल कार्यालय परिसरातील पर्यायी रस्त्यांवर बॅरिअर गेट्स आडवे करून रहदारी बंद करण्यात आल्याने दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला अनुभवायला मिळाला.

 मात्र यानंतरच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल होतांना सारखीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी मतदार नागरिकांकडून होत आहे.

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-किशोर गायकवाड, मुरबाड

वाचा...













Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments