#MP_BalyaMaMa | पहिल्याच भेटीत निवेदनांचा भडिमार-हाफ सेंच्युरी पार; येत्या बुधवारी मुरबाड रेल्वेचा विषय संसदेत मांडणार, रेल्वे मागणीच्या आपबीती बाबत 'हे' भलतेच आले समोर, कपिल पाटीलांची प्रतिक्रिया काय? कल्याण हायवेची शॉकिंग स्टोरी, वाचा... -Kishor Gaikwad


#MP_BalyaMaMa | पहिल्याच भेटीत निवेदनांचा भडिमार-हाफ सेंच्युरी पार; येत्या बुधवारी मुरबाड रेल्वेचा विषय संसदेत मांडणार, रेल्वे मागणीच्या आपबीती बाबत 'हे' भलतेच आले समोर, कपिल पाटीलांची प्रतिक्रिया काय? कल्याण हायवेची शॉकिंग स्टोरी, वाचा...

-Kishor Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. २०) : (किशोर गायकवाड) लोकसभेत विजयी झाल्यापासून नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे मुरबाड तालुक्याला विसरले असल्याचा आरोप होत असताना याबाबत शब्द मशालने वृत्त प्रसारित केले होते. 


MP Balyama In Murbad

 त्यान्वये, काल (दि. २० रोजी) शनिवारी भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खा. सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे (MP Suresh Balyama Mhatre)  मुरबाडच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृह शिवनेरी (Shivenri Resthouse Murbad) येथे उपस्थित होते. त्याच्या स्वागतासाठी इंडिया (INDIA) आघाडी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सह मोठ्यासंख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते. सुमारे ५० पेक्षा अधिक समस्यांची निवेदने खा. बाळ्यामामा यांना प्राप्त झाली असून महिन्यातून एकदा मुरबाडमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन जनता दरबार भरविण्यात येणार असल्याचे यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले.


MP Suresh (Balyamama) Mhatre

 तर चर्चेच्या सुरुवातीलाच मुरबाडकरांचे आभार व्यक्त करतांना खा. बाळ्यामामा यांनी कल्याण - मुरबाड रेल्वेच्या (Kalyan Murbad Railway) मुद्द्याला हात घातला. दि. ६ जुलै रोजी केलेल्या  विनंती अर्जानुसार आगामी संसदीय अधिवेशनात खा. बाळ्यामामा यांना बोलण्याची संधी देण्यात आली असून कल्याण - मुरबाड रेल्वे बाबत विषय मांडून केंद्रीय मंत्री महोदयांना पत्र देखील देणार असल्याचे म्हंटले. 




 महाराष्ट्र शासनाच्या अहवालानुसार कल्याण - मुरबाड रेल्वेच्या २४ कि.मी. लँड अक्वेझिशनला सुमारे १३०० कोटी रुपये लागणार असून केवळ २०० कोटी रुपये देण्याचे केंद्र सरकारने घोषित करून प्रत्यक्षात मात्र सॅन्क्शन केले नाही, याबाबत भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केंद्रात साधं पत्र सुद्धा सादर केले नसून चर्चा देखील केली नसल्याचा आरोप खा. बाळ्यामामा यांनी केला आहे. जलजीवन मिशनची प्रकरणे टक्केवारीमुळे अडकली असून यात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजपाचेच जिल्हा सरचिटणीस रामनाथ पाटील यांनी पत्राद्वारे केले असून त्यावर चौकशीची मागणी केली असल्याची माहिती खा. बाळ्यामामा यांनी दिली. तसेच ज्या गावाला जायला रस्ता नसेल त्या सर्वांनी निवेदन देण्याचे आवाहन केले असून याकामी चार पीए नेमण्यात आल्याने प्रत्येक समस्येवर लक्ष दिला जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.


MP Balyama Press Conference in Murbad

 अंतिमतः, खा. बाळ्यामामा यांनी पत्रकारांशी बोलतांना कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या संथरित्या सुरू असलेल्या कामाबाबत महिला अधिकारी यांच्या लबाडपणाचा आलेला अनुभव मांडला. तसेच आगामी विधानसभेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मविआतून राष्ट्रवादी (SP) ने मुरबाड आणि शहापूरची जागा मागितली असल्याचे बोलले. मुरबाडमध्ये पत्रकार भवनाच्या मागणी पत्रावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले आहे. तर येत्या संसदेच्या अधिवेशनात खा. बाळ्यामामा मुरबाडकरांच्या व्यथा आणि भावना कशाप्रकारे मांडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


MP Balyamama with Murbad Reporters

 याप्रसंगी खा. बाळ्यामामा समवेत व्यासपीठावर शिवसेना (UBT) पक्षाचे नेते तथा उपजिल्हा प्रमुख मधुकर उर्फ आप्पासाहेब घुडे, श्यामदादा गायकवाड यांच्या रिपाइं सेक्युलर पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने, नगरसेवक रामभाऊ दुधाळे, काँग्रेस (I) तालुकाध्यक्ष चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, शिवसेना (UBT) तालुका प्रमुख संतोष विशे, रिपाइं (S) तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, सेनानेते बाळासाहेब चौधरी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी (SP) नेते दत्ताभाऊ धुमाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) मुरबाड तालुका महिला अध्यक्षा डॉ. कविता वरे, काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या कदम, सामाजिक महिला कार्यकर्त्या योगिता शिर्के, CITU संघटनेचे मुरबाड युनिट अध्यक्ष दिलीप कराळे, राष्ट्रवादी (SP) नेते नामदेव गायकवाड, शहराध्यक्ष तेजस व्यापारी, अभिषेक डुंकवाल, यांचेसह पत्रकार व मोठ्यासंख्येने मविआ कार्यकर्ते व पदाधिकारी स्वागतोत्सुक होते.


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...














Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments