Loadnig : बाळ्यामामा रजेवर? मुरबाडकर नवनिर्वाचित खासदारांच्या मुखदर्शनाच्या प्रतिक्षेत; संभ्रमित कार्यकर्त्यांकडून नॉटरीचेबल खासदाराचा शोध सुरू?
-Kishor Gaikwad
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) लोकसभेच्या निकालानंतर भिवंडी मतदारसंघात परिवर्तन पाहायला मिळाले असून दोन टर्म पूर्ण केलेल्या भाजपा भारत सरकारचे मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांना पराभूत करून विजयी झालेल्या सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांची सध्या शोधाशोध चालली असल्याचा गोंगाट आहे.
मात्र विजयाची माळ गळ्यात पडल्यापासून मुरबाडकरांना खासदार बाळ्यामामा यांचे मुखदर्शन दुर्लभ झाल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजा पाठोपाठ बौध्द, आदिवासी समाजाच्या मतदार राजाने सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे [Suresh (Balyama) Mhatre] यांना सर्वाधिक पसंदी देऊन संसदेत पाठविल्याचे मान्य केले जाते. यावेळी मुरबाडमध्ये देखील मोठ्याप्रमाणात उत्साह साजरा करण्यात आला. मात्र मुरबाडच्या जनतेचे जाहीर आभार मानण्यासाठी बाळ्यामामा विसरले का? असा सवाल केला जात आहे. शिवाय शपथविधी देखील पार पाडून सुमारे महिना उलटला परंतु, तेव्हापासून खासदार बाळ्यामामा नॉटरीचेबल असल्याचा आरोप होत आहे. निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने, पुढील विकासाची धोरणे, मुरबाड - कल्याण महामार्गाच्या दयनीय अवस्थेवरील भूमिका, मुरबाडकरांची प्रलंबित प्रश्ने, अशा अनेक निरुत्तरीत प्रश्नांवर त्यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उत्सुक असलेला मुरबाडकर खासदार बाळ्यामामा यांच्या प्रतीक्षेत आहे. निवडणूकी नंतर एक दीर्घ काळ उलटला परंतु खासदार बाळ्यामामा मुरबाडच्या पत्रकारांन समोर देखील आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर विविध आरोप केले जात आहेत.
नुकताच मुरबाडमध्ये एका आदिम समाजाच्या गरोदर महिलेला प्रसूती उपचारासाठी झोळीतून नेण्यात आल्याचे वृत्त राज्यभर गाजले. परंतु, आपला मतदारसंघ असलेल्या मामांची यावर एकही ठोस प्रतिक्रिया ऐकविवात नाही. कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गाचे काम ऐन सणासुदीच्या पूर्वार्धात संथरित्या सुरू आहे. याप्रकरणी खा. बाळ्यामामा यांनी प्रवासी, वाहन चालक यांच्या व्यथा ऐकण्यासाठी भेटी घेतल्या पाहिजेत व ठेकेदाराला जाब विचारणे अभिप्रेत आहे.
टोरेंट पॉवर | गुलाल काढण्या आधी टोरेंट पॉवरला भेट देणार असल्याचे घोषवाक्य खा. बाळ्यामामा यांनी निवडणूक निकालपूर्व केले होता, त्याचे काय झाले? असा सवाल भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) यांचेकडून विचारण्यात आला आहे. तर टोरेंट पॉवर कंपनीवर लाखोंच्या संख्येने मोर्चा धडकला होता. याबाबत खा. बाळ्यामामा यांनी संधी सोनं केल्याचा सुध्दा आरोप होत आहे.
निवडणूक काळ उलटला की नेत्यांचा तोरा बदललेला असतो, अशीच काहीशी प्रचिती मुरबाडकरांना आल्याचे बोलले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (Rashtrawadi Congress Sharadchandra Pawar) कार्यकर्ते यांचेशी संपर्क साधला असता खासदार बाळ्यामामा तुला शोधू कुठे? अशी आर्त हाक पक्षाचे कार्यकर्ते मारत आहेत.
0 Comments