खेदजनक: : अपघाती वळणामुळे महामार्गवर भाताची नुकसानी..! [KISHOR K GAIKWAD]

Loss of grain on the NH 61


खेदजनक : अपघाती वळणामुळे महामार्गवर भाताची नुकसानी..!



[KISHOR K GAIKWAD]

मुरबाड (दि. १) : (किशोर गायकवाड) तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भात वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बाबत भाताच्या नुकसानीचा प्रकार घडला असून परिणामी नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे.


राष्ट्रीय महामार्ग ६१ वर धान्याची नुकसानी


  मुरबाड तालुक्यात (Murbad Taluka) सद्या शेतकरी बांधवांची भात विक्रीसाठी लगबग सुरू असून शेतकऱ्यांची भात वाहतूक करणारी वाहने सर्रास राष्ट्रीय महामार्गावर नजरेस पडत असतात. शेतकरी बांधव मोठ्या कष्टाने आपल्या शेतात राबून भाताचे पीक घेतो आणि जीवापाड त्याची जपणूक करून विक्रीसाठी नेत असतो. असाच भाताची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर टोकावडे नजीक मानिवली येथील राष्ट्रीय महामार्ग ६१ (National Highway 61) वरील अपघाती वळणामुळे नुकसानीच्या कचाट्यात सापडला. आज सकाळच्या (दि. १) सुमारास सदर ट्रॅक्टर भाताच्या गोणी वाहून नेत असतांना अपघाती वळणामुळे ट्रॉलीमधील भाताच्या गोणी रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर पडताच गोणी फाटून त्यातील भात महामार्गावर अस्ताव्यस्त विखुरला गेला. यात शेतकऱ्याचे बरेचसे नुकसान झाले आहे. 


Accidental turn on NH 61


 सदरचा भात हा वैशाखरे येथील सोसायटीवर नेत असल्याचे तेथील शेतकऱ्याने सांगितले. मात्र आधीच तालुक्यातील शेतकरी बांधव कायम नुकसानीच्या जात्यात भरडला जात असताना त्यात महामार्गावरील शेतकी वाहतूक देखील सुरक्षित नसल्याने मुरबाडचा शेतकरी बांधव चिंतातूर झाला आहे.

 -किशोर गायकवाड



भाग - २ | शेतकरी सहकारी संघाच्या भात खरेदी पसाऱ्याने घेतला वळण... सविस्तर : नवीन भाताची 'या' ठिकाणी व्यवस्था; वाचा, शेतकऱ्यांची व्यथा! [KISHOR GAIKWAD]

भाग - १ | भात खरेदीचा धान्य पसारा रस्त्याच्या कडेला... वाचा : 'या' कारणामुळे भात चोरीला जाण्याची शक्यता? [KISHOR GAIKWAD]

आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]

सामाजिक ऐक्य : ढोल ताशांचा गजर अन् कव्वालीचा स्वर; वांजळे गावच्या उर्समध्ये घुमतो एकोप्याचा नांद..! [ Kishor Gaikwad ]



Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor Gaikwad

0 Comments