भाग - १ | भात खरेदीचा धान्य पसारा हायवेच्या कडेला...
वाचा : 'या' कारणामुळे भात चोरीला जाण्याची शक्यता?
ठाणे/मुरबाड (दि.२८) : (किशोर गायकवाड) तालुक्यातील शेतकरी वर्ग दरवर्षी आपल्या शेतात पिकविलेला भात शेतकरी सहकारी संघाच्या भात खरेदी केंद्राला विक्री करत असतो. पर्यायाने पुढे जाऊन या भाताचा देश हितार्थ योग्य विनियोग घडून येणे अपेक्षित असते. मात्र त्याकरिता सदर भाताची साठवून, जपवणूक व निगा अत्यंत आवश्यक असून नेमका याच गोष्टींचा अभाव खरेदी विक्री संघाकडे वर्षानुवर्षे दिसून येत आहे.
![]() |
शिवळे येथील उघड्यावर ठेवलेला भात |
मार्केटिंग फेडरेशन आधारभूत योजने अंतर्गत मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघ दरवर्षी हजारो क्विंटल भात शेतकऱ्यांकडून विकत घेत असतो. मात्र निश्चित व सुरक्षित गोडावून अभावी खरेदी केलेल्या भाताची पुरता दैना होतांना पाहायला मिळत असून यंदा तर हा भात थेट राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ठेवलेला पाहायला मिळत आहे. या सर्वाला भात खरेदी विक्री संघाचा निव्वळ अनियोजितपणा व भोंगळ कारभार जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
खरेदी केलेला भात मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच एमआयडीसी (MIDC) मधील कंपनीमध्ये ठेवण्यात आला आहे. तर उर्वरित खरेदी सुरू असलेला भात हा राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी शेजारीच ठेवला जात असून पूर्णपणे उघड्यावर साठवणूक केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस भात चोरीला जाण्याची संभाव्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय अनपेक्षितपणे अवकाळी पाऊसाने हजेरी लावली तर शेकडो क्विंटल भाताचे काही क्षणात नुकसान होईल. तसेच योग्य संरक्षण नसल्याने उंदीर, घुशी अथवा अन्य यांचेकडून भाताची हानी होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी संरक्षणा अभावी शेतकऱ्यांचा भात शिवळे येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यालया शेजारी पडून आहे. (क्रमशः...)
-किशोर गायकवाड
वाचा...
आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]
0 Comments