![]() |
मुरबाड वांजळे दर्गा |
सामाजिक ऐक्य : ढोल ताशांचा गजर अन् कव्वालीचा स्वर; वांजळे गावच्या उर्समध्ये घुमतो एकोप्याचा नांद..!
KISHOR GAIKWAD
मुरबाड : (दि. २२) मुरबाड (Murbad) मधील वांजळे येथे असणाऱ्या हजरत अहमदशहा वली बाबा यांच्या दर्गाचा उर्स काल गुरुवारी सर्व जातीधर्मीय लोकांच्या सहकार्याने व उपस्थितीत संपन्न झाला.
![]() |
हजरत अहमदशहा वली बाबा दर्गा, मुरबाड वांजळे |
ठाणे जिल्हा एकता मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्बासभाई शेख व त्यांची टीम या उर्ससाठी दरवर्षी विशेष मेहनत घेत असते. तर यावर्षी हजरत अहमदशहा वली बाबा यांच्या दर्शनासाठी मोठा जनसमुदाय जमल्याने वांजळे (Wanjale) गावातील दर्गा परिसरात भव्य यात्रा भरलेली पाहायला मिळाली. तसेच उर्सची शोभा वाढविण्यासाठी सालाबादप्रमाणे एकता मंच तर्फे सुप्रसिद्ध कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्याचसोबत ढोलताशांच्या गजरात नौबत देखील ऐकायला, पाहायला मिळते.
या दर्गाची विशेष ओळख म्हणजे या दर्गाची देखरेख करणारे पुजारी शहाजी केशव लाटे व त्यांचे कुटुंब हे हिंदू धर्माचे असून गेल्या पाच पिढ्या लाटे कुटुंबीय या दर्गाची देखरेख व दिवाबत्ती करीत आहेत. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणार वर्ग हा सर्व जातीधर्माचा पाहायला मिळतो.
उर्स साजरा करण्यासाठी समस्त मुस्लिम बांधवांसह इतर समाज व मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. तर हा उर्स यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा एकता मंच संस्था व महिला कमिटी सह मदिना मस्जिद मुस्लीम समाज मोहरई, किशोर, शिरगाव, वाघीवली, आसोळे, कुडवली,पवाळे, कोलठण, भालुक, सुन्नी मुस्लिम जमात मुरबाड, ग्रामस्थ मंडळ वांजळे व अन्य नागरिकांचे सहकार्य लाभले. तसेच मुरबाड पोलिस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चतुरे मेजर व त्यांची संपूर्ण टीम तैनात होती.
-किशोर गायकवाड
वाचा...
मुरबाडमध्ये चाललंय काय? अल्पवयीनवर सातत्याने बलात्कार, तक्रार दाखल होताच आरोपीने संपविले जीवन? [KISHOR GAIKWAD]
0 Comments