मुताशेससं : उघड्यावरच्या भातावर पसरली ताडपत्री; भूपृष्ठावरील भाताचं काय? [KISHOR GAIKWAD]

Open grain storage Murbad

मुताशेससं : उघड्यावरच्या भातावर पसरली ताडपत्री; भूपृष्ठावरील भाताचं काय?


[KISHOR GAIKWAD]

ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) गेल्या महिना भरापासून मुरबाड तालुका शेतकरी हकारी संघांची भात खरेदी जोरात सुरू असून खरेदी केलेल्या भाताच्या साठवणूकी बाबत योग्य पूर्व तयारी नसल्याने खरेदी संघ तालुक्यात चर्चेला आला आहे.


Open grain storage around Janseva Pratishthan office


  महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन आधारभूत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचे नियंत्रणाखाली मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून सुमारे ८० हजार क्विंटल भात धान्य खरेदी केला आहे. हा धान्य शहरातील बाजार समितीची दोन गोदामे तसेच भाडेतत्त्वावरील एमआयडीसी (Murbad MIDC) येथील एका करखान्यात साठवलेला आहे. तर उर्वरित भात खरेदीचा पसारा शिवळे येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यालया बाहेर राष्ट्रीय महामार्ग ६१ (NH 61) शेजारी दिसून येतो. मात्र अद्याप खरेदी शिल्लक असल्याने यानंतरच्या भाताच्या साठ्यासाठी काकडपाडा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. 





  परंतु हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने उघड्यावरील भाताचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा बातम्या प्रसारित करून ही संघाने पूर्वतयारी केली नसल्याने संघाच्या कामकाजावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे संघ पुन्हा सन २०२१ ची पुनरावृत्ती होण्याची  वाट पाहत आहे का? तालुक्यात गेले दोन दिवस पाऊस सदृश वातावरण स्पष्ट असतांना संघ याबाबत दुर्लक्ष का करत आहे? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 



  तर उघड्यावर ठेवण्यात आलेल्या या भाताच्या गोणींवर आज (दि. २) प्लास्टिक ताडपत्रीचे आच्छादन टाकलेले दिसून येत आहे. असे असले तरी टाकण्यात आलेली प्लास्टिक ताडपत्री ही भाताचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी नसून भूपृष्ठावरील भात हा पूर्णपणे पाण्याच्या तावडीत सापडून नासाडी होण्याची दाट संभावना उघड आहे. त्यातच जर पाऊसाचा तडाखा जोरदार राहिला तर पसरविलेली ताडपत्री हमखास हवेच्या झोतात उडून गेल्यास सदरचे केविलवाणे प्रयत्न देखील अपयशी ठरतील आणि त्यामुळे शेकडो क्विंटल धान्याची नासाडी होईल. एवढे धान्य नव्याने पिकायला मोठा कालावधी खर्ची लागतो. मात्र जनतेच्या मुखातील घास मातीमोल होतांना पाहण्याची वेळ येऊ नये, अशी प्रार्थना केली जात आहे. त्यामुळे निदान यंदा तरी संघ यावर अत्यंत गंभीरपणे लक्ष देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 -किशोर गायकवाड



भाग - २ | शेतकरी सहकारी संघाच्या भात खरेदी पसाऱ्याने घेतला वळण... सविस्तर : नवीन भाताची 'या' ठिकाणी व्यवस्था; वाचा, शेतकऱ्यांची व्यथा! [KISHOR GAIKWAD]

भाग - १ | भात खरेदीचा धान्य पसारा रस्त्याच्या कडेला... वाचा : 'या' कारणामुळे भात चोरीला जाण्याची शक्यता? [KISHOR GAIKWAD]

आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]

सामाजिक ऐक्य : ढोल ताशांचा गजर अन् कव्वालीचा स्वर; वांजळे गावच्या उर्समध्ये घुमतो एकोप्याचा नांद..! [ Kishor Gaikwad ]



Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

Kishor K Gaikwad

0 Comments