IPC 498-अ : सासरच्या छळाला कंटाळून मुरबाडच्या लेकीने संपविली जीवनयात्रा
मुरबाड : (किशोर गायकवाड) तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या कर्जत तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून मुरबाड तालुक्यातील एका विवाहितेने सासरच्या जाचा कंटाळून आपली जीवनयात्रा संपविल्याची चित्तथरारक बाब समोर आली आहे.
याबाबत प्राप्त माहिती वरून, मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) विढे गावच्या शिंगले कुटुंबातील अश्विनी हिचा विवाह सन २०१८ रोजी कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) रजपे गावच्या घुडे कुटुंबातील संतोष याचे सोबत झाला होता. मात्र सदर मुलीचा मृतदेह शनिवारी (दि. १७) शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये (Karjat Police Station) भारतीय दंड विधान संहिता (IPC) अन्वये कलम ४९८-अ, ३०६ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेची खबर मयत पीडितेचा भाऊ देवेश मंगल शिंगले यांनी दिली आहे. तर मयत पीडितेचा पती संतोष सुदाम घुडे, सासू कुंतीबाई सुदाम घुडे, दिर रतन सुदाम घुडे व नणंद चित्रा मनीष आगिवले अशी आरोपीतांची नावे एफआयआरमध्ये नमूद आहेत.
![]() |
मयत पीडित अश्विनी घुडे |
मयत पीडित ही अंगणवाडी सेविका असून चारित्र्याच्या संशयावरून व घरगुती कामावरून तिला पती व सासरच्या मंडळींकडून जाच होता. तसेच ऊसाचा चरखा सुरू करण्यासाठी सासरच्या मंडळींनी अश्विनी हिला माहेरून ५०,००० रुपयांची केलेली मागणी शिंगले कुटुंबियांनी रोखीने पूर्ण केली असता सन २०२३ मध्ये पती संतोष गांजाच्या तस्करीत अडकल्याने पुन्हा शिंगले कुटुंबियांनी रतन घुडे यांच्या मागणी नुसार ५०,००० रुपये रोखीने दिल्याचे प्रथम खबरी अहवालात नमूद आहे. तर अश्विनीच्या पश्चात तिला समर्थ व हर्षद असे दोन मुले असून तिची आत्महत्या नसून हत्या केली असल्याचे आरोप शिंगले कुटुंबियांनी केला आहे. याबाबत कर्जत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
-किशोर गायकवाड
वाचा...
IPC 498-अ : सासरच्या छळाला कंटाळून मुरबाडच्या लेकीने संपविली जीवनयात्रा [KISHOR GAIKWAD]
0 Comments