एल्गार! रास्तभाव दुकानातल्या साड्या सरकारला परत...
आदिवासी क्रांती सेनेचा निर्णयाक पवित्रा!
[KISHOR K. GAIKWAD]
ठाणे/मुरबाड (दि. १) : (किशोर गायकवाड) लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार व राज्य सरकारने सध्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये १०० रुपयांमध्ये सहा प्रकारच्या अन्न धान्य किट सोबत अंत्योदय योजनेमधील एका महिलेला साडी देखील वाटप केली आहे. मात्र याला आदीवासी क्रांती संघटनेने आक्षेप घेऊन अतिशय हलक्या दर्जाची साडी देण्यापेक्षा आधी आम्हाला रस्ता, रोजगार, शिक्षण, पाणी द्या; अशा तीव्र भावना व्यक्त करत आदिवासी महिलांनी या साड्या शासनाला परत करून मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले.
![]() |
आदिवासी क्रांती सेनेचे तहसिलदार यांना निवेदन |
आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आदिवासींनी अनेक मागण्या केल्या आहेत. आदिवासींना रोजगार मिळावा, त्यांचे स्थलांतर थांबवले जावे, वाड्या पाड्यांना पाणी, रस्ते या सुविधा मिळाव्यात, दुर्गम भागातील ढासळलेली शासकीय आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी, इ. मागण्या करण्यात आल्या. यावेळी सरकारचा जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनास आरपीआय सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मुरबाड ता. अध्यक्ष दिपक वाघचौरे, वंचित बहुजन आघाडीचे ता. अध्यक्ष गुरुनाथ पवार आदिवासी एकता परिषदचे राजाभाऊ सरनोबत इत्यादींनी आपला पाठिंबा दर्शविला. आंदोलन मध्ये ता. अध्यक्ष मारुती वाघ, उपाध्यक्ष बाळा दळवी, बाळू लचका, सुनंदा खोडका, तानाजी भला, चिंतामण भांगरथ, लक्ष्मण खंडवी, ताई पवार इत्यादींसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. सदर मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार कविता बांगर यांनी स्वीकारले. तर आदिवासी भगिनींच्या या धाडसी भूमिकेमुळे विविध स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.
![]() |
आदिवासी क्रांती सेनेचा निवेदन |
आदिम वार्ता : वाह! वीटभट्टीवरील लेकरांच्या हाती आली पाटी पेन्सिल [KISHOR GAIKWAD]
0 Comments