मुरबाड मार्केट ब्रेकिंग : मामा शहा आणि आशिर्वाद मेडिकल सह 'या' दुकानांत चोरी; चोरट्यांनी काय काय नेले? पहा सीसीटीव्ही फुटेज...
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) मुरबाड शहरातील नामांकित दुकानांसह अन्य काही दुकानात काल रात्रीच्या सुमारास चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर कढल्याचे नागरिकांमध्ये भीतीने वातावरण आहे.
स्नेहल राजाभाऊ म्हात्रे यांचे मुरबाड शहरातील सुप्रसिद्ध आशिर्वाद मेडिकल, निलेश व वैभव शहा यांचे हर्षिता जनरल स्टोअर्स अर्थात मामा शहा शॉप तसेच त्याच्या शेजारील राहुल शहा यांचे शांती सेल्स व हेमंत शहा यांचे यशोधन कापड दुकान आदींचे शटर फोडण्यात आले आहे. तर यापैकी मामा शहा यांचे दुकानातून परफ्यूम, टोप्या, छत्री, पर्स लंपास असून आशिर्वाद मेडिकलमधून तिजोरी व फ्रीजमधील चॉकलेटचा पुडा चोरीला गेला आहे. चोरीला गेलेल्या तिजोरीमध्ये सुमारे सव्वा लाख रुपये रक्कम असल्याचा मेडिकल मालक म्हात्रे यांनी सांगितले. तसेच गल्ल्यात देखील काही रक्कम होती. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेतील महेश व निलेश साटपे यांचे ब्रायडल क्लोथ शॉपचे शटर देखील फोडण्याचे प्रयत्न चोरट्यांनी केले होते.
0 Comments