![]() |
| Ravi Yende, Coffee Seller Boy |
OMG : तुम्हाला माहित आहे का बाजारठेत सायकलवर अवघ्या ६ रुपयांत कॉफी विकणारा तो 'कॉफी बॉय' कोण आहे?
![]() |
| Engineer Coffee |
मुळात हा तरुण शैक्षणिक अर्हतेने एक मेकॅनिकल इंजिनिअर ( Mechanical Engineer ) असून त्याचे नाव रवि चंद्रकांत येंदे आहे. पुणे जिल्ह्यातील एका दुर्घटनेचा तो बळी आहे. कोण्या एका पहाटे पुणे जिल्ह्यातील 'साखरमाची' ( Sakharmachi ) गावाच्या मार्गावर अवकळा कोसळली आणि रस्त्या ढिगाऱ्याखाली येऊन या गावचा संपर्क तुटला. त्याच्या पुर्नवसन प्रक्रियेतील जुलमी प्रशासन, स्वार्थी लोकप्रतिनिधी यांच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाची ही व्यथा आहे.
![]() |
सन २०१४ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे जिल्ह्यातील माळीण ( Malin in Pune District ) गाव होत्याचे नव्हते झाले असतांना ही परिस्थिती त्याच डोंगर पट्ट्यातील साखरमाचीवर ( Sakharmachi ) येण्याची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी या गावच्या कुटुंबीयांना हलविण्याचे आदेश देण्यात आले. परिणामी अनेक आदिवासी कुटुंब उघड्यावर आली. या पीडित कुटुंबांचे पुर्नवसन मुरबाड येथे करण्यासाठी स्थलांतरित करण्यात आले. अशा परिस्थितीत रिकाम्या हाताला काम नाही म्हणून पदवीधर आणि मेकॅनिकल डिग्री असलेला तरुण रवी हा एका नामांकित कंपनीत नोकरी करत होता. मात्र जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनामुळे त्या नोकरीवर गदा आली. रोजंदारीवर काम शोधण्यासाठी भटकंती करीत असतांना आपल्याला रोजगार मिळत नसल्याने जवळ असलेल्या सायकलवर रवीने भाजीपाला विकण्याचा मार्ग पत्करला, मात्र त्यात त्याला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याने व्यथित न होता त्याच सायकलवर अवघ्या सहा रुपये दराने मोबाईल कॉफी विकण्याचा मार्ग पत्करला असून त्या सायकलवर त्याने घरपोच सेवा देण्यासाठी आपला नंबर टाकला आहे. सुरवातीला त्याने वर्षभर पाच रुपयांत कॉफीची सेवा दिली. मात्र दूध, साखरेचे वाढते भाव; यातून खर्च काढून हातात मेहनतीचे पैसे देखील उरत नसल्याने त्याने आपल्या दारात एक रुपयाने वाढ केली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्याच्या अनेकांशी ओळखी झाल्या असून मागे वृत्तपत्राच्या बातमीमध्ये ही तो झळकला होता.
मुरबाडमधील शासकीय कार्यालये तसेच फुटपाथवर असलेले फेरीवाले यांना जागेवर जाऊन रवी स्वस्त दरात कॉफी विकत आहे. त्याला ज्या ठिकाणाहून फोन येईल त्या ठिकाणी तो लवकरात लवकर कॉफी पोहोचवतो. अशा प्रकारे तो दिवसाला सुमारे दहा लिटर दूध, दोन किलो साखर व कॉफीचे पाकीट घेऊन दरदिवसाला सुमारे नऊशे ते हजार रुपये कमवून आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळत आहे.
अपयशाने हतबल न होता, प्रयत्नांची शिकस्त करीत परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या होतकरू इंजि. रवीचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा अल्प दारात कॉफी हा व्यवसाय वजा प्रयोग मुरबाड शहरात आकर्षणाचा विषय ठरला आहे. अशाच प्रकारे सुशिक्षित तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, असा संदेश यानिमित्ताने त्याने इतर बेरोजगार तरुणांना दिला आहे.
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
【FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!】









0 Comments