![]() |
Inspector Prasad Pandhare |
Break The Liquor : हातभट्टी वाल्यांनो... बिवेयर; इन्स्पेक्टर पांढरे इज कमिंग..!
पोलिसांची नजर चुकवून मद्य माफियांनी तालुक्यातील नारीवली, उचले, खाटेघर, वाघाची वाडी, कोरावळे, चिरड, तलेखल, खोपीवली इत्यादी परिसरात मोठ्याप्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या थाटल्याची माहिती मुरबाड पोलिसांना (Murbad Police)प्राप्त होताच पोलीसी हातोडा घेऊन पथकाने सदर ठिकाणी जाऊन हातभट्टी व त्यातील सर्व जिन्नस नेस्तनाबूत करून आरोपींना ताब्यात घेतले.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल सोनोने, उपनिरीक्षक निंबाळकर, तळेकर, कदम, सहायक उपनिरीक्षक दाभाडे, सहायक उपनिरीक्षक गुंड, पोलिस हवालदार भगवान निचीते, शेलार, चतुरे, भोसले, डोईफोडे, अडबोल, विचारे, खैरे, पोलिस नाईक के. पाटील, जीवन पाटील, रामा शिंदे, मोरे, पोलिस शिपाई शिरसाठ, बांगर, महिला पोलिस शिपाई जया फाळे यांनी विशेष मेहनत घेतली.
आता पर्यंत सुमारे २३ बेकायदेशीर दारूच्या हातभट्ट्या समूळ नष्ट करण्यात आल्या असून संबंधित दोषींवर अजामीन पात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पीआय पांढरे यांनी सांगितले आहे. तसेच असे बेकायदेशीर, समाजाला विघातक कृत्य तालुक्यात कुठे आढळल्यास मुरबाड पोलिसांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
【निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!】
【FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!】
0 Comments