पहा व्हिडीओ : मुरबाडकरांचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून इन्स्पेक्टर पांढरे यांचे सायबर क्राईम अलर्ट..! [ Kishor Gaikwad ]

 

पहा व्हिडीओ : मुरबाडकरांचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून इन्स्पेक्टर पांढरे यांचे सायबर क्राईम अलर्ट..! [ Kishor Gaikwad ]

[ KISHOR GAIKWAD Murbad ] 

ठाणे/मुरबाड (दि. २०) : (किशोर गायकवाड) ऑनलाइन फसवणूकीच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांच्या व्यथा सांगणाऱ्या विविध बातम्या आजवर आपल्या कानावर आल्या असून फसवणूकीचे हे नैराश्य मुरबाडकरांच्या वाट्याला येण्यापासून रोखण्यासाठी इन्स्पेक्टर पांढरे यांनी सायबर क्राईम अलर्टचा (Cyber Crime Alert) व्हिडिओ प्रसारित केला आहे.


  मुरबाडचा नागरिक सुरक्षित, दक्ष व अद्यावत राहावा यासाठी मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे हे सोशियल मीडियाद्वारे ऑनलाइन व्हिडिओ प्रसारित करून सातत्याने मुरबाडच्या जनतेशी संवाद साधत असतात. हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात  बहुतांशी व्यवहार ऑनलाइन पध्दतीने झाले आहेत. तर सोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटना ही दिवसेंदिवस समोर येत आहेत. मात्र मुरबाडचा नागरिक या घटनांचा बळी ठरू नये यासाठी पूर्व सावधगिरी कशी बाळगावी? हे समजून सांगणारा व्हिडिओ पीआय पांढरे यांनी नुकताच सोशियल मीडियावर व्हायरल केला आहे. यात त्यांनी ऑनलाइन गुन्ह्याचे स्वरूप, फसवणूकीचे प्रकार, रचना व त्यावर पर्याय या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व जनसामान्यां पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले जात आहे.

Prasad Pandhare Murbad Police
Murbad Police Inspector Shri. Prasad Pandhare

    यापूर्वी इन्स्पेक्टर पांढरे यांनी रिंग राउंड पेट्रोलिंगची क्लुप्ती अंमलात आणली होती. मुरबाड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीआय पांढरे मुरबाडकरांना वेळ देऊन वेगवेगळ्या उपाययोजना आखत असतात. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांचे सर्व स्तरावरून भरभरून कौतुक केले जात आहे. 

Police Station, Murbad


किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...

निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!

FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!

 【मुरबाड- RTI इम्पॅक्ट | द्वितीय अपिलाच्या सुनावणीने पीडब्लूडी उपविभाग हादरले..!



असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments