दणका : हरिजन शब्द हटविला..! Kishor Gaikwad



दणका : हरिजन शब्द हटविला..! Kishor Gaikwad

रिपइं सेक्युलरच्या निवेदनाची दखल...

Kishor Gaikwad, Murbad

ठाणे/मुरबाड : तालुक्यातील कळंभाड भो. येथील ग्रामपंचायत (Grampanchayat) विभाजन प्रक्रियेच्या एका पत्रकामध्ये चक्क कायद्याने प्रतिबंधित केलेला हरिजन शब्द वापरला असल्याची बाब आरपीआय सेक्युलरच्या निदर्शनास येताच ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने आक्रमक भूमिका घेत पत्रव्यवहार केल्याने सदर परिशिष्टातून हरीजन शब्द वगळण्यात आला आहे.



  मुरबाड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने अशा वस्त्यांचे अन्य नामकरण करणाऱ्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करतांना मुरबाड तहसीलदार यांनी प्रभाग रचनेत अनेक गावांमध्ये चक्क हरिजन वस्ती असा परिशिष्ट तक्त्यात उल्लेख केला. मुळात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या यादीत हरिजन अशी कुठलीही जात नसताना तहसिलदार यांनी असा असंविधानिक शब्द वापरणे हे गैर असून यामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्याचे आज आरपीआय सेक्युलरद्वारा आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने यांनी सांगितले. 

पत्रव्यवहारा नंतरचा सुधारित पत्रक

आधीचा पत्रक

  सदर गंभीर बाब मुरबाड तहसीलदार, कल्याण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्रव्यवहार करून  कळवली. तदनुसार याबाबत दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली असून सदरचे परिपत्रक दुरुस्ती करून हरिजन शब्द वगळून नव्याने जारी केले आहेत. शिवाय यातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य असतांना अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री साठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले होते. याउलट प्रभाग क्रमांक एक मध्ये अ. जा. ची लोकसंख्या १४७ असतांना अ. जा. साठी एकही जागा आरक्षित नव्हती. ही चूक ही नव्याने जारी पत्रकात दुरुस्ती करण्यात आली आहे.

Ravinda Chandane and Team


  मात्र अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक अशी कृत्ये करीत असतील तर त्यांच्यावर आरपीआय सेक्युलर कायदेशीर कारवाई केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा रविंद्र चंदने यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे. याप्रसंगी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धनगर, युवा अध्यक्ष  राजेश गायकवाड, निखिल अहिरे, किशोर गायकवाड, अविनाश रातांबे, सचिन धनगर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...


निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!

FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!

 【मुरबाड- RTI इम्पॅक्ट | द्वितीय अपिलाच्या सुनावणीने पीडब्लूडी उपविभाग हादरले..!



असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments