जीवितहानीस सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार -मनसे
[ KISHOR GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : ( किशोर गायकवाड ) शहरातील म्हसा रोड नाका परिसरातील संभाव्य पूर सदृश परिस्थितीवर वेळेत मात करण्यासाठी मुरबाड शहर मनसेने पुढाकार घेतला असून याबाबत मुरबाड नगरपंचायतीला पत्रव्यवहार केला आहे.
मुरबाड शहरातील म्हसा रोड येथील नैसर्गिक नाल्यावर साई विश्व सोसायटीच्या लगत अज्ञाताने बेकायदेशीररित्या काँक्रीट स्लॅबचे बांधकाम केले असून दरवर्षीच्या पावसाळी पूर सदृश परिस्थितीला सदर स्लॅब जबाबदार असल्याचा आरोप करीत मनसे शहर अध्यक्ष नरेश देसले यांनी सदर बाधित स्लॅब काढून टाकण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. मात्र सदर अर्जाची वेळेत दखल न घेतल्याने देसले यांनी नगरपंचायतला स्मरणपत्र सादर केले असून वेळेत कारवाई न झाल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे यात म्हंटले आहे.
![]() |
Nagarpanchayat, Murbad |
दर पावसाळी मुरबाड शहरातील ( Murbad City ) म्हसा नाका ( Mhasa Naka ) परिसरात मोठ्याप्रमाणात नाले तुंबून पाणी साचते. लगतच्या सोसायटींच्या कुटुंबियांचा लाखों रुपयांचा नुकसान होतो. मागील वर्षी याच नाल्यातून एक वाटसरू वाहून गेल्याची घटना घडली असून नागरिकांच्या दक्षतेमूळे अनर्थ टळल्याचे स्मरणपत्रात नमूद असून पुन्हा अशा साचलेल्या पाण्यामुळे एखादी जीवितहानी घडल्यास यास पूर्णपणे मुरबाड नगरपंचायत जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर स्लॅबवर सध्या दुचाकींची पार्किंग केली जात असून त्याचा रहदारीसाठी वापर होत असल्याचे दिसत आहे.
![]() |
मनसेचा अर्ज |
![]() |
मनसेचा स्मरणपत्र |
मात्र मनसेच्या अर्जाची दखल घेऊन सदर काँक्रीट स्लॅबचे बांधकाम न हटविल्यास याविरोधात पक्षा तर्फे आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा सदर पत्रातून देण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी नेमकी काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
【निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!】
【FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!】
0 Comments