कौतुकास्पद : नवोदयच्या प्रवेशासाठी सम्यकवर शुभेच्छांचा वर्षाव...
प्राप्त माहितीअन्वये, 'जवाहर नवोदय विद्यालय' ( Jawahar Navodaya Vidbyalaya ) ही १०० टक्के शासन अनुदानीत विद्यालये असून ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. सदर विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे राबविली जात असून यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिली जाते. भारतातील काही गुणवंत विद्यार्थांना शिकण्याची संधी यात मिळत असते. या विद्यालयात शिक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी - विविध जिल्ह्यातून सुमारे १०००० विद्यार्थी नवोदयची परीक्षा देतात; या परीक्षेत शिर्षस्थानी असलेल्या ८० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते.
दरवर्षी ठाणे व पालघर मधून प्रत्येकी ४० विध्यार्थ्यांची निवड केली जात असून त्यात २० शहरी व २० ग्रमीण अशा भागातून जातीनिहाय वर्गवारी होत असते. यंदा ठाणे-पालघर मधून सुमारे १३ हजार विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी बसले होते. यात मुरबाड तालुक्यातील सम्यक नरेश देसले याने बाजी मारली असून त्याचे पुढील शिक्षण आता केंद्र शासनाकडून होणार आहे. सम्यकच्या या यशासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे. सम्यकचे वडील नरेश शांताराम देसले यांचे सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असून आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्याला हे यश प्राप्त करणे सोपे झाल्याचे त्याने सांगितले.
सम्यकचे इयत्ता ५ वी पर्यंतचे शिक्षण मुरबाडच्या जिल्हा परिषद शाळेत झाले असून त्याला मार्गदर्शन करणारे वरिष्ठ शिक्षक काशिनाथ राऊत, भालचंद्र गोडांबे, कल्पना सूर्यराव, चेतन पवार, मनोज वाघ इ. शिक्षकांनी त्याची भेट घेऊन त्याला विशेष शुभेच्छा दिल्या व तोंडकौतुक केले.
मागील वर्षी मुरबाड तालुक्यातून पत्रकार मुकेश शिंदे यांची मुलगी संबोधी हिने नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला होता. यंदा हे यश सम्यकने पटकावून मुरबाडच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
0 Comments