NEWS NO. 200/Shabd Mashal | निराशाजनक : मुरबाडकरांच्या पदरी साचलेला विकास... Kishor Gaikwad Murbad

रस्त्यावर साचलेले पाणी


NEWS NO. 200/Shabd Mashal | निराशाजनक : मुरबाडकरांच्या पदरी साचलेला विकास...

[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : ( किशोर गायकवाड ) मुरबाडचा चेहरामोहरा प्रथमदर्शनी विकसलेला भासावा या हेतूने शहरातील मुख्य रस्त्यांना डांबरमुक्त करून काँक्रीटीचे करण्यात आले खरे; तदनुरूप या रस्त्यांचे काँक्रीटीकरण होतांना ते पुरते  सपाटीचे असणे नियमप्राप्त असल्याचा विसर मात्र अभियंत्यांना पडलेला स्पष्ट दिसून येत आहे.


   करोडो रुपये खर्ची लावून मुरबाडच्या बाजारपेठेत व शहरात ( Murbad City Market ) तयार केलेले काँक्रीट रस्ते ठिकठिकाणी खरबडीत झालेले नजरेस पडतात. रस्त्यांना बनवितांना त्यांचा पृष्ठभाग समतल असावा, याचा विचार बांधकाम कर्त्यांनी केलेला दिसत नाही. अनेक ठिकाणी वाहने जंप होऊन आदळतात. परिणामी वाहनांची व त्यातील सामना सहित प्रवाश्यांची दैना होत असते. या असमतोल रस्त्यांमुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळते. हेच पाणी वाहनांमुळे वाटसरूंच्या अंगावर उडते. तर अनेकदा हे साचलेले पाणी चुकवीतांना छोटीमोठी अपघाते घडून येतात.


  भाजप आच्छादित मुरबाड नगरपंचायतीच्या ( Nagarpanchayat, Murbad ) कार्यक्षेत्राचा विकास होत असतांना सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाही झपाट्याने विकास घडून आला आहे. सत्ताकरेंच्या मर्जीतील ठेकेदारांनाच ही विकास कामे वाटप होऊन मलिदा बहाल केला गेला. विना झिजक करोडोंची बिले ही अदा झाली. परिणामी मुरबाडकरांच्या पदरी पावसाळ्यात रस्त्यावर चिखल वाट्याला आले. या सर्वांना नेमकं जबाबदार कोण? याचे उत्तर सर्वश्रुत आहे.


"कोट्यवधींचा खर्ची दाखवून नगरपंचायतने हे काँक्रीट रस्ते शहरात  बनविले. निव्वळ शासनाचा निधी लाटण्यासाठी व आपले नगरसेवक, ठेकेदार पोसण्यासाठी हा विकास आहे. यातील म्हसारोड ते सोनार आळी दरम्यानचे काँक्रीट रस्ते बौद्धवस्तीच्या निधीची अफरातफर करून बनविण्यात आले आहेत. शहरातील रस्ते इंजिनियर्सरने बहुदा झोपेत बनविल्याने यांवर पाणीसाठा होत असतो.  नगरपंचायतची ही पाणी आडवा, पाणी साठवा योजना या रस्त्यांवर राबविली जात असावी. मात्र या साचलेल्या पाण्यामुळे जर मुरबाडकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर यांस एकमेव मुरबाड नगरपंचायत जबाबदार असेल. याच रस्त्यांवरून विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. या चिखलामुळे त्यांचे कपडे खराब होत असल्याची तक्रार जरी आमच्या कार्यालयात आली तर आरपीआय सेक्युलर ते कपडे नगरपंचायतकडून धुवून घेतल्या शिवाय राहणार नाही."
     -पँथर रविंद्र चंदने, आरपीआय सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष.

 किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...







   


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

 

0 Comments