सावधान : मुरबाड तालुक्यातील 'या' डॅमचे द्वार उघडल्याचे तहसिलदारांना पत्र..! [ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]


🔴 सावधान : मुरबाड तालुक्यातील 'या' डॅमचे द्वार उघडल्याचे तहसिलदारांना पत्र..!

धरणाखालील गावांना सतर्कतेचा ईशारा...

[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड (दि. १४) : ( किशोर गायकवाड ) हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यात ( Thane District ) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुरबाड तालुक्यातील ( Murbad Taluka ) गावपाड्यांमधील डॅमच्या पाणाच्या विसर्ग प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

  पावसाने सर्वत्र थैमान घातला असून पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले आहे. राज्यातील मोठं-मोठ्या नद्या धोक्याची पातळी ओलांडून दुथडी भरून वाहत आहे. राज्यातील, जिल्ह्यातील हजारों गावपाड्यांचे रस्ते, पूल पाण्याखाली आलेले आहेत. अनेक ठिकाणी प्रशासन हतबल ठरत आहे. तर नागरिकांनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची परिस्थिती ओढवली आहे. विध्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण न होवो, याकरिता ठाणे जिल्ह्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांना पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ( District Collector Rajesh Narvekar ) यांनी जाहीर केले आहेत. तर अनेक छोटेमोठे डॅम ओव्हरफ्लो झाले असून त्याखालील गावांना धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka ) गावपाड्यांतील डॅमच्या पाण्याचे विसर्ग ही करण्यात सुरुवात झाली आहे.

Pawale Dam

  

  वासिंद पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभागाच्या अधिपत्या खाली येणाऱ्या मुरबाड तालुक्यातील पवाळे डॅमची (Pawale Dam ) पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी सदर डॅममधील पाणी विसर्ग करण्यात आला असून याबाबतचे हस्तलिखित पत्र मुरबाड तहसिलदार यांना पाठविण्यात आले आहे.

  सध्यस्थितीत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुरनियंत्रणाच्या दृष्टीने मातीच्या धरणाचे मुख्य द्वार काल दि. १३ जुलै रोजी दुपारी २ वाजता ३० सेमीने उघडण्यात आले असून पुढील काही दिवसांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता धरणामधून अधिक विसर्ग करण्यात येणार असल्याचे सदर पत्रात नमूद आहे. त्यामुळे धरणाखालील गाव-पाड्यांना सतर्कतेचा ईशारा देण्याबाबत मुरबाड तहसिलदार यांना सदर पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.



  पवाळे डॅमच्या पाणी विसर्गामुळे पवाळे, पिंपळगाव, भालुक या गावांना सर्वाधिक धोका निर्माण झाला असून कोणत्याही गावकऱ्याने शेतावर जाऊ नये तसेच जनावरे चरण्यासाठी सोडू नये, असे आवाहन करण्याचे कार्य स्थानिक तरूणांकडून सुरु आहे.
पाटबंधारे विभागाचे तहसिदारांना पत्र


 "एक फुटाने डॅमचे गेट वर केलेले आहेत. आणखीन वर करावे लागतील. गावातील लोकांनी डॅम परिसरात फिरू नये तसेच नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. मुरबाड तहसिलला पत्र दिलेले आहे."  
   -महेंद्र गवाळे, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, वासींद

   "पवाळे डॅमचे पाणी सोडल्याने आमच्या गावाला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. आम्ही कोणीही शेतावर गेलो नाही. तसेच जनावरे ही सोडली नाहीत. गावात सर्वांना सूचित करण्याचे काम आम्हा तरुणांकडून सुरूच आहे. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी आम्हा तरुणांची तयारी आहे."
    -गीतेश हरी पवार, युवा ग्रामस्थ, पवाळे

 किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...










   
आजच आपल्या पसंदीचे वाहन बुक करा


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments