Mansoon Schools Breaking | उद्यापासून शाळांना सुट्टी... वाचा आदेश..! [ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]

Schools Closed in Thane


#Mansoon Schools Breaking | उद्यापासून शाळांना सुट्टी... वाचा आदेश..! 


[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]

ठाणे/मुरबाड (दि. १३) : ( किशोर गायकवाड ) ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा (Orange Alert In Thane District) इशारा देण्यात आला असून पूर्व दक्षता म्हणून जिल्ह्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळेंना पुढील काही दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होवू नये, याकरिता ठाणे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश नार्वेकर ( Thane District Collector and Thane District Disaster Management President  Rajesh Narvekar ) यांनी ठाणे जिल्हयातील सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या (प्री स्कुल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना उद्या दि. १४ जुलै व ते दि.१५ जुलै पर्यंत सुट्टी घोषित केली आहे. याबाबतचे शासन आदेश नुकसाच सोशियल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहे. 

   मात्र सदर कालावधीमध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे गरजेचे असल्याचे सदर आदेशात नमूद आहे.

 दि. १४ व १५ रोजी, गुरुवार व शुक्रवार तसेच तद्नंतर शनिवार व रविवार हक्काची सुट्टी असल्याने पावसाने चिंतातुर झालेल्या पालक व विध्यार्थी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...









   


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)



0 Comments