![]() |
| Monsoon Flood Situations |
मान्सून अपडेट्स : मुरबाडमध्ये पावसाचे धुमशान...!
[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड (दि. १३) : ( किशोर गायकवाड ) पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असतांना मुरबाड तालुक्यातील अनेक गाव पाड्यांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरात पाणी साचले...
शहरातील विद्यानगर, अक्सिस बँक परिसर याठिकाणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात पाणी साचत असते. म्हसा नाक्यावरील सहयोग प्लाझा शेजारील एका विकासकाने थेट नैसर्गिक नाल्याच्या प्रवाह अरुंद केल्याने यंदा ही परिस्थिती आणखीनच भयानक पाहायला मिळत आहे.
लांबाची वाडीचा संपर्क तुटला...
मुरबाड नगरपंचायत ( Murbad Nagarapanchayat ) हद्दीतील खरब्याची वाडी येथून लांबाच्या वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुरबाडी नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्याने या वाडीचा संपर्क तुटला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग ६१ ते लांबाची वाडी येथील रस्ता नुकताच डांबरीकरण करण्यात आला होता. मात्र कमकुवतपणामुळे हा रस्ता उखडून गेला असून अनेक वर्षानंतर हा रस्ता नुकताच बनविण्यात आला होता. त्यामुळे उन्हाळ्यात पुन्हा येथील नागरिकांना रस्त्याच्या समस्येला सामोरे जाण्याची परिस्थिती ओढवणार आहे.
![]() |
| School Childrens |
![]() |
| NH 61 |
किशोर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली...
मुसळधार पावसाने मुरबाडी नदीच्या ( Murbadi River ) पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने किशोर गावा ( Kishor village ) जवळ राष्ट्रीय महामार्ग ६१ यंदा पुन्हा पुराच्या पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला. त्यामुळे सुमारे सहा ते सात तास महामार्गावरील वाहतूक बंद होती. परिणामी चाकरमानी, विद्यार्थी मोठ्याप्रमाणात अडकून पडलेले पाहायला मिळाले. याप्रसंगी मुरबाड पोलीस स्टेशनचे (Murbad Police Station ) पीएसआय निंबाळकर, पोलीस नाईक विनायक खेडकर, पोलिस पाटील भोईर यांच्या टीमने रेस्क्यू ( Rescue Team ) करून अनेक विध्यार्थ्यांची पुराच्या पाण्यातून सुटका केली.
![]() |
| Teen Haat Naaka, Murbad |
नाकाबंदी व तैनात पोलिस...
राष्ट्रीय महामार्ग ६१ बंद ( NH 61 CLOSED ) असल्याने तिनहात नाका पोलिस चौकी जवळ महामार्गावर बॅरियर गेट लावून जुन्नर, माळशेज मार्गे येणाऱ्या वाहनांना सावध आणि सूचित करण्यात आले. मुरबाड पोलिस स्टेशनचे मेजर विजय गांजले यांनी भरपावसात ही कामगिरी चोख बजावली.
![]() |
| Moroshi, Nyahadi Fata |
![]() |
| Tree on NH 61 |
मोरोशी जवळ महामार्गावर झाड...
माळशेज घाटाच्या ( Malshej Ghat ) पायथ्याशी मोरोशी जवळील न्याहाडी फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर मातीचा भराव आणि वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. याबाबत मुरबाडच्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे ( Disaster management ) उडविलेले धिंडवडे सोशियल मीडियावर ( Social Media) पाहायला मिळाले.
[ किशोर गायकवाड मुरबाड ]














0 Comments