#MURBAD ROBBERY INCIDENT : IIFL च्या गोल्ड चोरीसाठी सोनोग्राफी सेंटरच्या भिंतीला भगदाड..!
फिल्मी स्टाईलने चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न...
![]() |
| Vedant Sonography Centre, Murbad |
[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड (दि. १५) : (किशोर गायकवाड) विविध पद्धतीच्या शक्कल लढवून चोरट्यांनी चोऱ्या केल्याच्या अनेक घटना आजवर आपण ऐकल्या असतील, मात्र चक्क भिंतीला भगदाड पाडून फिल्मी स्टाईलने चोरी करण्यचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. १५ रोजी) पहाटे मुरबाडच्या बाजारपेठेत उघडकीस आली आहे.
मुरबाड शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या प्रवेशद्वारा जवळ असणाऱ्या नामांकित आर.के. हॉटेल शेजारील पोतदार शॉपिंग सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर IIFL गोल्ड लोनची शाखा तसेच डॉ. मेघना जितेंद्र बेंढारी यांचे वेदांत सोनोग्राफी सेंटर आहे. येथील IIFL गोल्ड शाखेमध्ये लाखों रुपयांचे सोने गहाण ठेवलेले असते. त्याच्याच शेजारी डॉ. बेंढारी यांचे सोनोग्राफी सेंटर असून दोघांची भिंत एकच आहे. याचाच फायदा घेत चोरट्यानी सोनोग्राफी सेंटरच्या शर्टरचा लॉक तोडून आत प्रवेश केला व आय.आय.एफ.एल. ब्रँच आणि सोनोग्राफी सेंटरची सामायिक भिंत तोंडण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. बेंढारी यांनी सांगितले.
![]() |
| डॉ. बेंढारी यांचा तक्रारी अर्ज |
याबाबत डॉ. बेंढारी यांनी मुरबाड पोलिस स्टेशनला (Murbad Police Station) पत्राद्वारे तक्रार दाखल केली असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. सोनोग्राफी सेंटर मधून काही चोरीला गेले नसून चोरट्यांनी नुकसान करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सदर तक्रारी अर्जात म्हंटले आहे. मात्र भिंतीचे नुकसान करून IIFL मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे सदर अर्जात नमूद आहे.
![]() |
| Vedant Sonography Centre, Murbad |
मुरबाड पोलिसांकडून रात्री रिंग राउंड पेट्रोलिंग (Ring Round Patrolling) होत असल्याचे बोलले जात असतांना सदर गंभीर घटना ऐन तीनहात नाका पोलिस चौकीपासून (Teenhaat Naka Police Chauki) चक्क हाकेच्या अंतरावर घडणे अर्थात रिंग राउंड पेट्रोलिंगचा उडालेला फज्जा आहे, अशी चर्चा बाजारपेठेत जोर धरत असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. तर या घटनेने बाजारपेठेतील छोटेमोठे व्यापारी धास्तावले आहेत.
![]() |
| Potdar Shopping Center,Murbad |
तालुक्यातील दुभती जनावरे चोरीचे संकट मुरबाडच्या शेतकऱ्यांच्या माथी असतांना आता व्यापाऱ्यांचे व्यवसाय ही असुरक्षित झाल्याने त्यांच्यात ही भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सदर चोरटे एक होते की अनेक? टोळी असल्यास मुरबाड पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात किती कालावधी लागेल? मुरबाड शहरातील माऊलीनगर येथे ही मध्यंतरी चोरट्यांचा वावर असल्याच्या घटना सीसीटीव्हीमधून समोर आल्या होत्या. असे असतांना मुरबाड सुरक्षित आहे का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा











0 Comments