निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..! [ Kishor Gaikwad ]
ऑक्सिजन पार्क की कार्बनडाय ऑक्सासईड पार्क?
![]() |
Oxygen Park, Murbad |
बागेश्वरी तलावाच्या सभोवताली असणाऱ्या वन विभागाचा ( Forest Department) हा जंगल; या जंगलामध्ये पेव्हर ब्लॉकच्या पायवाटा, कार्टून्सचे पुतळे, लहान मुलांची काही खेळणी व मातीच्या विटा रचून केलेली रिंगणं इ. बाबींना ऑक्सिजन पार्कचा गोंडस शीर्षक देऊन लाखों रुपयांची अफरातफर घडवून आणण्यात वन अधिकाऱ्यांना यश आल्याचे म्हणता येईल?
या पार्कमधील बागेश्वरी तलावाच्या ( Bageshwari Lake ) किनाऱ्याला बंद अवस्थेत दोन बोटी नजरेस पडतात. उद्घाटनकर्ते मान्यवर यांनी यातून केलेली बोटिंग सफर ही शेवटची म्हंटली जात. त्यानंतर त्या बोटिंग ( Botaing ) पुन्हा पाण्यात सहल करतांना कोणी पहिल्याच नसल्याचे बोललेले जात आहे. याव्यतिरिक्त दोन आणखीन जीर्ण पॅडल बोटी ( Padle Boat) जखमी अवस्थेत पायऱ्यांवर पाहायला मिळतील. लाखोंची अफरातफर जिरविण्यासाठी हातच्याला राखून ठेवलेल्या या बोटी कधी बागेश्वरीच्या पाण्यात दिसल्या नाहीत? या बोटींपासून खाली तलावा पर्यंत जाणारा पायी सिमेंट विटांचा कच्चा रस्ता वृद्ध-लहानग्यांसाठी धोकादायक झाला आहे.
![]() |
Boating in Bageshwari Lake |
कार्टून्सचे पुतळे आणून पार्क सजविण्याना वन अधिकाऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न स्पष्ट दिसत असून या पुतळ्यांच्या बिलात लावण्यात आलेल्या किंमत पाहून थक्क होयला होते. असे असले तरी सद्यस्थितीला हे पुतळे योग्य निगा अभावी बँडेज लावलेल्या अवस्थेत तर काही पुतळे काठ्यांच्या आधावर उभे आहेत.
पार्कच्या सुरुवातीला विविध प्रकारच्या वृक्षांची नावे तर दिलीत मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी ती वृक्ष अस्तित्वात नाही. मुळात कुंपणच शेत खात असल्याने तक्रार करायची कुठे? मागील वर्षी तळ्याला डबराची पिचिंग करण्यात आली, परंतु यातील निम्याधिक डबर खनिज आला कुठून? हा संशोधनाचा विषय म्हणावा लागेल.
या पार्कमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवण्यासाठी अल्प पगारी दोन खासगी माणसे नेमली असून तुटपुंज्या पगारात त्यांना पार्कच्या कामांची जबाबदारी पूर्ण करावी लागते.
या ऑक्सिजनचा घाट घातलेले अधिकारी पार्कची विचारपूस करायला शेवटी कधी आलते? त्यांनाच आठवत नसावे. मुळात हा ऑक्सिजन पार्क आहे की कार्बनडाय ऑक्सासईड पार्क? हा जाब संतप्त मुरबाडकर विचारण्या आधीच हे अधिकारी आपला गाशा गुंडाळून बदली होऊन कधीच पुढच्या स्थानकावर पोहचले. मात्र हा अर्धवट करून ठेवलेला पसारा आवरणार कोण?
"पार्क खुला झाला तेव्हा वाटले आपली लहानमुले व वृद्ध मंडळींचा सायंकाळचा प्रश्न सुटला. पण निराशा वाट्याला आली. शहरातून येथवर येऊन तसा काहीच अनुभव येत नाही. पार्कमध्ये असाव्यात अशा सुविधा नाहीत. लहान मुलांची खेळणी ही आता मोडकळण्याच्या मार्गवर आहे. येथवर येण्यासाठी रस्ता ही उखडला आहे. टायर पंक्चर होण्याची भीती वाटते. शिवाय येथे सुरक्षित पार्किंगची सुविधा ही नाही."
-अभ्यागत, मुरबाड
[ किशोर गायकवाड ]
【निराशाजनक : मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कची दुर्दशा..!】
【FOREST FOOD | खवय्यांची शेवळा भाजीला पसंती..!】
【मुरबाड- RTI इम्पॅक्ट | द्वितीय अपिलाच्या सुनावणीने पीडब्लूडी उपविभाग हादरले..!】
0 Comments