मान्सून अपडेट्स : मुरबाड - वाशिंद दरम्यानचा काळू नदीवरील पूल पाण्याखाली; संपर्क तुटला... पहा व्हिडिओ... -Kishor Gaikwad


मान्सून अपडेट्स : मुरबाड - वाशिंद दरम्यानचा काळू नदीवरील पूल पाण्याखाली; संपर्क तुटला... पहा व्हिडिओ...

#Kishor_Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. ) : (किशोर गायकवाड) मुरबाड - वाशिंद यांना जोडणारा चिखले येथील काळू नदीवरील पूल सालाबादप्रमाणे पाण्याखाली बुडाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

  मुरबाड तालुक्यातील शिरगाव, चिखले, करवळे, झापवाडी व शहापूर तालुक्यातील शेरे, आंबर्जे, वाशिंद, मासवणे या गावांचा आपसातील संपर्क तुटला आहे. मात्र निद्रिस्त आपत्ती व्यवस्थापनाला याबाबत खबर नसल्याचे बोलले जात असून या परिसरात खबरदारीच्या सूचना आढळून येत नाही.  

 त्यामुळे असयंमी वाहन चालक या पाण्यातून गाडी टाकून धोका ओढवून घेण्याची तिव्र संभावना आहे. याबाबत प्रशासनाने वेळेत लक्ष देऊन सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तजवीज करण्याची मागणी केली जात आहे.

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments