#SHABD MASHAL IMPACT : 'ते' खड्डे भरले, नागरिकांना-प्रवाशांना तूर्तास दिलासा..! [ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]

Murbad Mhasa Naka

#SHABD MASHAL IMPACT : 'ते' खड्डे भरले, नागरिकांना-प्रवाशांना तूर्तास दिलासा..! 


[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]

ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) अगदी पहिल्या पावसापासून मुरबाड शहरातील म्हसा नाका परिसर खड्डेमय झाला असल्याचे वृत्त दि. ३ ऑगस्ट रोजी शब्द मशालने प्रसारित केले होते. याबाबत दखल घेऊन सदर धोकादायक खड्डे तात्काळ प्रशासनाने भरले असून या कामगिरीसाठी नगरपंचायत प्रशासनाला धन्यवाद तर शब्द मशालचे (Shabd Mashal) सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बातमी पूर्वीचा फोटो
बातमी नंतरचा फोटो

 

  दोन राष्ट्रीय महामार्गांना (National Highway) जोडणारा हा टी-जंक्शन ऐन वळणावर गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय झाला होता. सदरचे खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे नागरिकांना येथून प्रवास करणे धोक्याचे झाले होते. शिवाय या खड्ड्यांमुळे एखादी मोठी हानी ही घडण्याची संभावना होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नरेश देसले यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे खड्डे भरण्याची मागणी केली होती. नगरपंचायत प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शब्द मशालच्या निदर्शनास आल्याने वस्तुस्थिती जाणण्यासाठी जाब विचारला असता, मुळात सदर खड्डे हे एमएसआरडीच्या (MSRDC) अख्यारीत येत असल्याचे उत्तर पदरी पडले. 



  त्यामुळे सदर खड्डे प्रकरण नगरपंचायत व एमएसआरडीच्या (MSRDC) च्या वादात सापडल्याच्या आशयाचे वृत्त शब्द मशालने बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. सदर वृत्ताची दखल घेत संबंधित खड्डे नगरपंचायत विभागाकडून डबर खडीचा भराव वापरून भरण्यात आले आहेत. सबब नागरिकांना व त्यांच्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. याबाबत नागरिकांकडून शब्द मशालचे धन्यवाद व्यक्त केले जात आहेत.  तर सदर खड्डे कायमचे भरण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरेश देसले यांनी सांगितले आहे.


[ किशोर गायकवाड मुरबाड ]

वाचा...







असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 



एकवेळ नक्की भेट द्या..!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

आजच आपल्या पसंदीचे वाहन बुक करून घरी आणा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

0 Comments