चिखल्या झाल्यावर करा हे सोपे घरगुती उपाय


  नमस्कार मित्रांनो पावसाळा म्हणजे मस्त पाऊस हिरवळ आणि गरमागरम भजी सोबत वाफाळलेला चहा. हे सर्व तर घरी बसून पाहिल्यावर छान वाटतं किंवा घरात राहून ह्याचा आनंद घेण्यात खूप छान वाटतं पण बाहेर जाऊन काम करणाऱ्यांना याच पावसाचा खूप त्रास होतो. पावसाळ्यात बऱ्याच प्रकारचे इन्फेक्शन होतात, त्यातीलच एका इन्फेक्शन बद्दल आज आपण बोलणार आहोत खूप वेळ पाय पाण्यामध्ये राहिल्यावर व शेतात काम करणारे शेतकऱ्यांना पायात चिखल्या चा त्रास होतो. तर आज आपण आपल्या बळीराजा साठी या चिखल्यावरचे वेगवेगळे उपाय पाहणार आहोत. 

चला तर पाहूया यावरचे उपाय काय काय आहेत जे तुम्हाला घरच्या घरी करता येतील.

१. पहिला उपाय आहे घोंगडी आणि गोडेतेल (जे आपण स्वयंपाकात वापरतो) आपल्या सर्वांच्याच घरात विणलेली घोंगडी असतेच. तर त्या घोंगडीचा एक धागा घ्यायचा आणि तो गोडेतेलत भिजवायचा.तो पूर्णपणे गोडे तेलात भिजल्यावर ज्या बोटावर आपल्याला चिखल्या उठलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या बोटाला तो घोंगडी चा धागा बांधायचा आणि रात्रभर तसंच राहू द्या. (जास्त घट्ट बांधायचा नाही रक्त प्रवाह अडखळू शकतो).

२. दुसरा उपाय आपण पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे हळद आणि खोबरेल तेल जे घरात आपल्या सहज उपलब्ध असतं या दोन्ही वस्तूमध्ये अँटी बॅक्टरियाल गुण असतात जे जखम भरून यायला मदत करतात. म्हणूनच हे दोन्ही समप्रमाणात घेऊन मिक्स करायचे त्याची एक छान पेस्ट करून ती झालेल्या चिखल्यांवर लावायची आणि रात्रभर राहू द्यायचे. त्याआधी पाय पाण्याने स्वच्छ धुऊन पुसून कोरडे करून घ्यावेत.

३. तर आता पाहूया तिसरा उपाय आपल्याला लागणार आहे मेहंदीची पावडर, जी बाजारात उपलब्ध असते तर यामध्ये आपल्याला मेहंदीची पावडर पण चालेल किंवा मेहंदीची पेस्ट सुद्धा चालेल. कोण मध्ये मेहंदी येते ते रासायन विरहित असेल तर घ्यावी नाहीतर मग पावडर भिजवून घ्या.आणि रात्री पाय स्वच्छ धुऊन पुसून घ्या कोरडे करा व्यवस्थित आणि त्याच्यावर तो मेहंदीचा लेप लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. मेहंदी ही थंड असल्यामुळे तुम्हाला त्याचा व्यवस्थित उपाय होईल.आणि रात्रभर ठेवल्यामुळे ती जखम पण भरून यायला मदत होईल. 

तर मित्रांनो हे आहेत साधे साधे उपाय. तसे बाकी अनेक मलम मेडिकल स्टोअर मध्ये मिळतात पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे योग्य राहते. हे उपाय नक्की करून पहा आणि आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. तर हेल्दी खा आणि हेल्दी रहा. आजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण स्वतःसाठी पण जगा.

टिप : मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचे वैद्यांचे सल्ले घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमच्या शब्द मशाल पेजला लगेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

वाचा...






असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 



एकवेळ नक्की भेट द्या..!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

आजच आपल्या पसंदीचे वाहन बुक करून घरी आणा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments