Developing Murbad Updates : म्हसा नाक्यावरचे जीवघेणे खड्डे MSRDC आणि नगरपंचायतच्या वादात...
[KISHOR K. GAIKWAD MURBAD]
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) शहरातील म्हसा नाका परिसर पहिल्या पावसापासून खड्डेमय झाला असून सदर खड्ड्यांची तक्रार नेमकी करायची कुठे? हा संशोधनाचा विषय बनला आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६१ व ५४८अ (NH 61 and NH 548) यांना जोडणाऱ्या मुरबाड शहरातील म्हसा-कर्जत (Mhasa - Karjat) गावाकडे जाणाऱ्या वळणावर गेल्या काही महिन्यांपासून जीवघेणे खड्डे पडले असून याबाबत नगरपंचायतला विचारणा केली असता सदर महामार्ग एमएसआरडीसी (MSRDC) अख्यारीत येत असल्याने खड्ड्यांची जबाबदारी एमएसआरडीसीकडे असल्याचे सांगितण्यात आले. तर एमएसआरडीसी (MSRDC) कार्यालय थेट वांद्रे येथे असल्याने हे खड्डे आजतागायत दुर्लक्षित असून सदर खड्ड्यांची लांबी-रुंदी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी नागरिकांना, प्रवाशांना आपली वाहने या खड्ड्यांतून नेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुरबाड शहर विकासाच्या गर्तेत असल्याचे वारंवार लोकप्रतिनिधींकडून सांगितले जाते. मात्र ऐन नाक्यावर हे जीवघेणे खड्डे गेले महिनाभर प्रशासनाकडून पोसले जात असल्याचा खोचक टीका केल्या जात आहेत. त्यामुळे विकासाची नेमकी व्याख्या कोणती? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तर या खड्ड्यांकडून प्रशासन मोठया अपघाताची वाट पाहतोय का? असा सवाल ही नागरिकांकडून केला जात आहे. मात्र सदर खड्डे वेळेत न भरल्यास सदर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नरेश देसले यांनी शब्द मशालशी (Shabd Mashal) बोलताना सांगितले. त्यामुळे या प्रशासकीय वादातून सदर खड्ड्यांची मुक्तता होऊन प्रवासी पादचाऱ्यांना सुरक्षित व सुसज्ज मार्ग कधी मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"सदर महामार्ग एमएसआरडीसी यांच्याकडे असून त्यावरील खड्डे बुजविणे त्यांची जबाबदारी आहे. जरी ते कानाडोळा करीत असले तर वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर खड्डे हे लवकरच नगरपंचायतकडून बुजविण्यात येतील."-श्री. परितोष कंकाळ (मुख्याधिकारी, नगरपंचायत मुरबाड)
[ किशोर गायकवाड मुरबाड ]
0 Comments