संतापजनक : मुरबाडकरांच्या नळाला 'गढूळाचं पाणी' तर फिल्टरेशनसाठी न.पं.ने १० महिन्यांपूर्वीच केले होते तब्बल ६८ लक्ष रुपयांचे खर्च..! [ KISHOR GAIKWAD MURBAD ]


संतापजनक : मुरबाडकरांच्या नळाला 'गढूळाचं पाणी' तर फिल्टरेशनसाठी न.पं.ने १० महिन्यांपूर्वीच केले होते तब्बल ६८ लक्ष रुपयांचे खर्च..!

सोशियल मीडियावरील 'त्या' पत्राने मुरबाडकरांना बसेल धक्का




[ KISHOR GAIKWAD MURBAD ]
मुरबाड : (किशोर गायकवाड) मार्च महिन्यापासून मुरबाड नगरपंचायतीने (Nagarpanchayat Murbad) शहरवासीयांच्या तोंडचं पाणी पळवले असून दिवसा आड होणारा अपुरा पाणी पुरवठा आता अक्षरशः चिखल युक्त होत असल्याने सोशियल मीडियावर संताप व्यक्त होतांना पाहायला मिळत आहे. परिणामी गढूळ पाणीपुरवठ्याने (Muddy Water Supply) मुरबाड शहर (Murbad City) वासीयांवर रोगराईचे संकट घोंघावत आहे.
Nagarpanchayat Office, Murbad

Muddy Water

   सबब शहरातील लहानमुले, वृद्ध यांसह अन्य नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर सहानुभूती म्हणून की काय नगरिकांनी पाणी उकळून, गाळून घ्या, प्या असे काळजी वाहणारे प्रेम संदेश जारी केले जात असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पहिल्या पावसात पाण्यासोबत माती ही येत असल्याने नळाला चिखलयुक्त पाणी येत असल्याचे सांगितले जात आहे. तर याबाबत मुरबाड नगरपंचायतीचा नियोजन शून्य कारभार समोर येत असून दुर्लक्षितपणा करून नगरपंचायतीने पाणी विक्रेत्यांना पोषक वातावरण निर्माण करून दिले आहे.


  अशातच एक धक्कादायक माहिती सोशियल मीडियावर प्रसारित झाली आहे. व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर नगरपंचायतीचा 'मे. इन्फ्राप्लॅन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि., कोल्हापूर' यांचे नावे असलेला दि. १०/०८/२०२२ रोजीचा कार्यदेश व्हायरल झाला आहे. 'मुरबाड नगरपंचायत हद्दीतील बागेश्वरी जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनेशन प्रकल्प कार्यान्वयीत करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग व इतर अनुषंगीक कामे करणे' या विषयांकित सदर आदेश असून या कामाची अंदाजित रक्कम ६८,७१.७६८/- इतकी नमूद आहे. ज्याअर्थी एवढी मोठी रक्कम जर नगरपंचायतीने केवळ पाणी समस्येवर सुमारे दहा महिन्यांपूर्वीच खर्च केली आहे, तरीही स्वच्छ पाण्यासाठी नगरिकांच्या पदरी वणवण का? त्यामुळे कुंपणच शेत खातंय का? अशी दाट शंका आता शहर वासीयांच्या मनात निर्माण झाली आहे.

Water Meter

muddy water from government faucet

  बिसलेरीचं पाणी पिणाऱ्या नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना सामान्य मुरबाडकरांच्या तहानेची किंमत नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. याच पाणी प्रश्नावर भांडता भांडता एकेकाळचे शिवसेनेचे शहराध्यक्ष भाजप मधून नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. मात्र पाणीची आणीबाणी काही थांबेना; त्यातच नगरिकांना विश्वासात न घेता, अशा भयावह संकटात नगरपंचायतीने पाण्याचे मीटर त्यांच्या माथी मारले आहेत. त्यामुळे 'घरचं झालं थोडं, त्यात व्याह्यानं धाडलं घोडं' अशी म्हणण्याची वेळ नगरिकांवर येऊन ठेपली आहे. मात्र सत्ताकऱ्यांनी प्रभागातील ठेकेदारीकडे अधिक लक्ष दिल्याचे चित्र मुरबाडमध्ये पाहायला मिळत आहे.


  आता या चिखलीयुक्त पाण्यामुळे मुरबाड शहरातील शासकीय टाक्यांमध्ये गाळ साचले असतील हे निश्चितच, सबब या टाक्यांना साफ करण्याच्या नावे पुन्हा शासनाच्या निधीची लय लूट ही साहजिकच; शिवाय नागरिकांना सोसायटी, इमारतींवरील, घरातील खासगी टाक्या गाळमुक्त करण्यासाठी ही भुर्दंड सोसावा लागणार आहे.
- किशोर गायकवाड

Work Order

Join our Whats App Group

 _____________________________________________

वाचा...

संतापजनक : मुरबाडकरांच्या नळाला 'गढूळाचं पाणी' तर फिल्टरेशनसाठी न.पं.ने १० महिन्यांपूर्वीच केले होते तब्बल ६८ लक्ष रुपयांचे खर्च..! KISHOR GAIKWAD MURBAD ] 

#Annihilation Of Caste : आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप'? ]

संघर्षाचं सोनं : अन् जय हिंद अकॅडमीच्या 'प्रिया'ची MSF मैदानात 'जय' ] 

आनंदवार्ता : नगरपंचायतीच्या दुर्लक्षित वाड्यांनी टाकली कात..! ]

[ POLICE ON ACTION MODE : सेंटरिंग प्लेट्स चोर मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात..! ]

[ मुरबाड नगरपंचायतीच्या नगरपथविक्रेता समितीच्या सदस्य पदी लेबर फ्रंट युनियनचे ६ सदस्य बिनविरोध ]

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

0 Comments