Annihilation Of Caste : आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप'? | Inter-caste marriage scheme 'full stop'?

Annihilation Of Caste :आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप'? |Inter-caste marriage scheme 'full stop'?


Inter-caste marriage scheme 'full stop'?

KISHOR GAIKWAD MURBAD

ठाणे : (किशोर गायकवाड) सामाजिक विषमतेचे मूळ अर्थात जातीव्यवस्था व या जातीयतेला समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी पर्याय म्हणून आंतरजातीय विवाह योजनेकडे पाहिले जाते. मात्र असे असतांना ही योजना सद्या ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून नव्याने कुटुंब उभारणीसाठी शासनाकडून ५० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र सन २०२१ पासून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना कोणत्याही स्वरूपाची प्रोत्साहन पर निधी मिळाली नसल्याने सदर जोडपे ठाण्याच्या समाज कल्याण कार्यलयात हेलपाटे मारतांना नजरेस पडत आहेत. याबाबत कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता निधी अभावी प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी सुमारे ३०० हुन अधिक अर्जांचा खच या कार्यलयात धूळ खात पडला आहे.

  छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या पूर्वीपासून अनेक राष्ट्रपुरुषांनी आजवर जात निर्मूलन चळवळीत योगदान दिले आहे. परंतु विषमतेच्या विरोधातील या लढ्यात सरकारची भूमिका उदासीन आहे का? सबब जाणीवपूर्वक निधीची तरतूद करण्यासाठी टाळाटाळ करत आहे का? तर आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप' लागलंय का? अशा अनेक प्रश्नांमुळे सरकारच्या ध्येयधोरणांवर शंका उपस्थित केली जात असून आंतरजातीय विवाहित जोडपे प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

     - किशोर गायकवाड     

Join our Whats App Group

वाचा...






[सुभेदार गड आला पण... | Subhedar Movie Teaser Released]

[ऐके काळी क्रिकेट वर्ल्डकप खेळलेला खेळाडू आज चालवतोय बस !!]

[अनारक्षित प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव सुलभ करण्याचा भारतीय रेल्वेचा उद्देश आहे]

[2023 चे पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) आणि त्याची संपूर्ण माहिती]

जुनी पेन्शन? मग पगार पण जुनाच घ्या; शासकीय कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय आंदोलन सोशियल मिडियावर ट्रोल..!]


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

0 Comments