संघर्षाचं सोनं : अन् जय हिंद अकॅडमीच्या 'प्रिया'ची MSF मैदानात 'जय' [ KISHOR GAIKWAD MURBAD ]

Priya Gondhali

संघर्षाचं सोनं : अन् जय हिंद अकॅडमीच्या 'प्रिया'ची MSF मैदानात 'जय' 

[ KISHOR GAIKWAD MURBAD ]

मुरबाड : डिफेन्स खात्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना मुरबाड शहरात (Murbad City) सरावाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या जयहिंद अकॅडमीची कुमारी प्रिया तानाजी गोंधळी हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात [Maharashtra Security Force (MSF)] वर्णी लागली असून याकरिता तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



  मुरबाड शहरातील इच्छुक विद्यार्थ्यांच्या, मैदान व योग्य मार्गदर्शन अभावी पदरी पडणारा अपयश लक्षात घेऊन शहरतील शैलेंदर यादव, विष्णू गिरी, अनिकेत अढाइगे या तरुणांनी एकत्र येऊन अशा इच्छुक विद्यार्थ्यांना जयहिंद अकॅडमीच्या (JaiHind Academy) माध्यमातून अत्यल्प खर्चात ट्रेनिंग उपलब्ध करून दिली. या संधीच सोनं करत जयहिंद अकॅडमीचे (JaiHind Academy) विद्यार्थी आता आपली स्वप्न पूर्ण करतांना पाहायला मिळत आहेत. 

   



  गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ही मुले मुरबाड तालुक्यातील विविध रस्त्यांवर, माळ रानात पायात जीव ओतून धावतांना नजरेस पडतात. या दरम्यान अनेकदा यशाने त्यांना हुलकावणी दिली आहे. त्यातच कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक यांसह जागा, मैदान, प्रवास अशा अनेक समस्यांना या विद्यार्थ्यांनी तोंड दिले. एकवेळ अशीही आली की अकॅडमी बंद करून मिळेल तो काम स्वीकारून आपला उदरनिर्वाह करण्याचा विचार त्यांनी केला. मात्र तालुक्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे व अशाच काही सामाजिक जाणिव असलेल्या मंडळींनी पुढाकार घेऊन आपल्या कुशल वक्तृत्ववाने तथा अनुभवाने या निराश विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांची पाऊले पुन्हा मैदानाकडे वळवली. परिणामी आज एक एक करत ही तरुण मंडळी त्यांना अपेक्षित यश प्राप्त करत आहेत. त्यांच्या संघर्षाचं सोनं होतांना पाहून विविध स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 



"हे एक संघर्षाचं क्षेत्र आहे. जो मेहनत घेईल, तो नक्कीच अपेक्षित यश प्राप्त करेल. आमचा सहकारी फौजी अनिकेत अढाइगे आज देशसेवेत रुजू असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असून तुटपुंज्या सुट्टीत ही तो अकॅडमीच्या मुलांना आपला वेळ देत असतो. मुरबाडमधील सर्वाधिक तरुण - तरुणी हे देशसेवेत रवाना व्हावेत, हा आमचा प्रमुख हेतू आहे. येणाऱ्या प्रत्येक भरतीत आपल्या मुरबाडमधील सर्वाधिक विद्यार्थी निवडले गेले पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." 

            -प्रशिक्षक, जयहिंद अकॅडमी मुरबाड

Join our Whats App Group

 _____________________________________________

वाचा...

संघर्षाचं सोनं : अन् जय हिंद अकॅडमीच्या 'प्रिया'ची MSF मैदानात 'जय' ] 

आनंदवार्ता : नगरपंचायतीच्या दुर्लक्षित वाड्यांनी टाकली कात..! ]

#Annihilation Of Caste : आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप'? ]

[ POLICE ON ACTION MODE : सेंटरिंग प्लेट्स चोर मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात..! ]

[ मुरबाड नगरपंचायतीच्या नगरपथविक्रेता समितीच्या सदस्य पदी लेबर फ्रंट युनियनचे ६ सदस्य बिनविरोध ]

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

0 Comments