आनंदवार्ता : नगरपंचायतीच्या दुर्लक्षित वाड्यांनी टाकली कात..!

आनंदवार्ता : नगरपंचायतीच्या दुर्लक्षित वाड्यांनी टाकली कात..!

अखेर प्रभाग क्रमांक २ विकासाच्या वाटेवर तर देसले दांपत्यांच्या थडपडमुळे वाढती 'लोकपसंदी'

Murbad Ward No. 2 is on the way to development

मुरबाड (दि. २८) : नेहमीच सोयीसुविधांची वानवा असलेल्या मुरबाड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. २ मधील आदिवासी वाड्यांमध्ये आता सुगीचे दिवस पाहायला मिळत असून येथील आदिवासी बांधवांच्या विविध भौतिक समस्या एकामागे एक मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केला जात आहे.



  नगरपंचायत स्थापनेच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षित प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. मात्र या कालावधीत घरपट्ट्यांच्या खांदेपालट खेरीज कोणताही विकास याठिकाणी झाला नसल्याचे तेथील ग्रामस्थ सांगत आहेत. परिणामी तेथील ग्रामस्थ निराश होते. विशेष करून लांबाची वाडी व खरब्याची वाडी मधील अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांची सर्वाधिक हिरमोड झाली होती. मात्र द्वितीय पंचवार्षिकला येथून मानसी मनोज देसले या भरघोस मतांनी निवडून आल्या व या देसले दांपत्यांनी येथील ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन कामाला सुरुवात केली. आज मितीला येथील मुख्य नाल्यावरील पूल, अंतर्गत काँक्रीट रस्ते, दिवाबत्ती, पाणीपुरवठा अशा विविध आवश्यक बाबींकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या दोन्ही वाड्यांमध्ये खासगी तथा रोजगार विषयक तसेच आर्थिक, कौटुंबिक व आरोग्यविषयक अडचणींमध्ये देसले दांपत्यांचा कायम मदतीचा हात असतो. लवकरच येथील धार्मिक स्थळांच्या विकासाकडे लक्ष दिले जाणार असल्याचे देसले यांनी सांगितले.


  प्रभाग क्रमांक २ मध्ये लांबाची वाडी, खरब्याची वाडी अशा आदिवासी बहुल वाड्या समाविष्ट असल्याने येथील आदिवासी बांधवांच्या समस्या ही जटिल आहेत. मात्र देसले दांपत्य सातत्याने त्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी तत्पर असतात. या बांधवांना आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी पायपीट नको, म्हणून लोकप्रतिनिधी देसले दांपत्यांनी आपले कुटुंबच या वाडींच्या शेजारी स्थलांतरित केले आहे.


  तर पूरपरिस्थितीसाठी कुप्रसिद्ध असलेला विद्यानगरचा संपूर्ण परिसर आता पुरमुक्त होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. बुधवारी (दि. २८ रोजी) लांबाची वाडी येथील अंतर्गत काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन, देसले यांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन तथा त्यांच्या हस्ते शुभारंभाचा नारळ फोडून केले. जलदगतीने रस्त्याचा अडथळा मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी याप्रसंगी देसले दांपत्यांचे गहिवरून धन्यवाद व्यक्त केले. तसेच भर पावसा दरम्यान वाडीतील घरांमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाण्याचा मार्ग ही यंदा स्वखर्चाने बदलण्यात आल्याने घरात पाणी भरण्याच्या संकटातून देखील यंदा बऱ्यापैकी सुटका झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. आपल्या प्रभागात कुटुंबाप्रमाणे लक्ष केंद्रित केल्याने सर्वाधिक 'लोकपसंती' प्राप्त नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी म्हणून देसले दाम्पत्यांचे सर्वत्र नाव लौकिक होत आहे.

  "येथील आदीवासी बांधवांच्या समस्यांना मार्गी लावणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्याकरीताच त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडणूक दिले आहे. आमच्यावरील त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्या मूलभूत गरजा, प्राथमिक सुविधा यासोबतच आरोग्य, रोजगार यांचे प्रश्न व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, याकडे आमचे विशेष प्राधान्य असते आणि राहील. या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे, हा आमचा मुख्य हेतू आहे. यासोबतच विद्यासागर, कल्याणनगर, डोहळ्याचा पाडा या भागातील नागरिकांसाठी आमचा वेळ नियोजित असतो. प्रभागातील लोकांच्या शुभकामना, हीच आमच्या कामाची पोचपावती आहे."

                    - मानसी मनोज देसले (नगरसेविका प्र. क्र. २ तथा उपनगराध्यक्षा, न. पं. मुरबाड)


Join our Whats App Group

 _____________________________________________

वाचा...

आनंदवार्ता : नगरपंचायतीच्या दुर्लक्षित वाड्यांनी टाकली कात..! ]

#Annihilation Of Caste : आंतरजातीय विवाह योजनेला 'फुल्लस्टॉप'? ]

[ POLICE ON ACTION MODE : सेंटरिंग प्लेट्स चोर मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात..! ]

[ मुरबाड नगरपंचायतीच्या नगरपथविक्रेता समितीच्या सदस्य पदी लेबर फ्रंट युनियनचे ६ सदस्य बिनविरोध ]

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

0 Comments