![]() |
| Murbad Police Station Team |
सरळगावच्या नाकाबंदीने लाखोंची चोरी टळली
KISHOR GAIKWAD MURBAD
मुरबाड (दि. २५) : (किशोर गायकवाड) मुरबाड एमआयडीसी परिसरातील उभ्या वाहनांमधून डिझेल, पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीला मुरबाड पोलिसांनी आपल्या रिंग राऊंड पेट्रोलिंगच्या माध्यमातून जेरबंद केल्याची घटना ताजी असतांना आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी मुरबाड पोलिसांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार (दि. २५ रोजी) मुरबाड पोलिस स्टेशन (Murbad Police Station) अंतर्गत सरळगाव (Saralgaon) चौकात पोलिस हवालदार भरत ननवरे, पोलिस नाईक जीवन पाटील, देवरे मेजर व पथक यांची नाकाबंदी सुरू असताना सायंकाळी ०४:४५ वाजेच्या सुमारास एका मागे एक वेगाने संशयित रित्या जाणाऱ्या एमएच ०४ एलइ ७९०६ क्रमांकाची टेम्पो व एमएच ०५ डीक्यु ५७१९ क्रमांकाची ऑटोरिक्षा यांना उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी थांबण्याचा इशारा दिला असता पोलिसांना हुलकावणी देवून वाहने बेपर्वाईने निघून गेली. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करण्यास सुरुवात करताच त्यांनी सदर् वाहने रोडच्या बाजूला लाऊन पोबारा केला.
पोलिसांनी सदर् टेम्पो व रिक्षा ची पाहणी केली असता त्यात लोखंडी सेंटरिंग प्लेट्स आढळून आल्या. तर सदर मालमत्तेचा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले. यातील फिर्यादीला शोधून त्यांच्या तक्रारी वरून चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. यात सुमारे ५,०७,०००/- रु किमतीचे (पाच लाख, सात हजार रु) लोखंडी सेंटरिंग प्लेट्स, सुमारे ३,०००००/- ( तीन लाख) टेम्पो वाहन व सुमारे १,००,०००/-( एक लाख) किंमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पीएसआय निंबाळकर, हवालदार भरत ननवरे, पो. नाईक जीवन पाटील, पो. ना. देवरे यांच्या टीमने गुप्त सूत्रांच्या आधारे जलदगतीने करून गुन्ह्यातील ४ आरोपींना शिताफीने अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयाला कडून ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी (PCR) देण्यात आली आहे. तर अजून तीन आरोपींचा शोध मुरबाड पोलीस घेत आहेत.
यापूर्वी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे (Prasad Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलिसांनी आखलेल्या रिंग राउंड गस्त, VDP- ग्राम सुरक्षा रक्षक दल, प्रभावी नाकाबंदी, व्हिजिबल पोलिसिंगला अशा विविध प्रयोग आणि क्लुप्त्यांना यश आले आहे.
तर या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुन्हा एकदा पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत असून तालुक्यात कायदा सुव्यवस्थे बाबत कोणती सूचना, तक्रार अथवा माहिती देणे असल्यास निःसंकोच व निर्भीडपणे मुरबाड पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पीआय पांढरे यांनी शब्द मशालशी बोलतांना केले आहे.
-किशोर गायकवाड
_____________________________________________
वाचा...
[ POLICE ON ACTION MODE : सेंटरिंग प्लेट्स चोर मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात..! ]







0 Comments