महावितरणच्या विद्युत तारांमुळे आदिवासींची तीन घरे जळून बेचिराख - KISHOR K. GAIKWAD|SHABD MASHAL

 महावितरणच्या विद्युत तारांमुळे आदिवासींची तीन घरे जळून बेचिराख|Three houses of tribals were burnt down due to hanging power lines


महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा -सभापती श्रीकांत धुमाळ

Three houses of tribals were burnt down due to hanging power lines
POWER LINE HANGING

MSEB OFFICE MURBAD
MSEB OFFICE MURBAD

मुरबाड (दि. १५) : महावितरणच्या लोंबकळत्या विजेच्या तारांमुळे मुरबाड तालुक्यातील मोहरई कातकरी वस्तीतील तीन आदिवासींची घरे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना काल दुपारच्या सुमार घडली आहे. याबाबत पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी विविध वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून चौकशीची मागणी केली आहे.


Three houses of tribals were burnt down due to hanging power lines
Houses Burnt Due to Power Line

  सुरेश रामु वाघे, बाळु वाघे व शिवा वाघे असे पिढीत कुटुंब प्रमुखांची नावे असून यांच्या घरावरून महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाहाच्या तारा गेल्या आहेत. सदर जीर्ण अवस्थेत असलेल्या लोंबकळत्या तारांमुळे स्पार्किंग होऊन या तीन घरांचे नुकसान झाल्याचे सभापती धुमाळ यांनी सदर पत्रात म्हंटले आहे. या स्पार्किंगमुळे या तीन आदिवासी बांधवांची संपूर्ण घरे बेचिराख झाली असून महावितरणचे कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कारभारामुळे संबंधित घटना घडल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. तर या आगीमुळे या आदिवासी बांधवांचे सर्व होत्याचे नव्हते झाले असून ही तिन्ही कुटुंब उघड्यावर आली आहेत. या धोकादायक तारांमुळे कधीही मोठी हानी उद्भवू शकते, अशी संभाव्य भिती यापूर्वी अनेकदा येथील आदिवासी कुटुंबियांनी महावितरणकडे व्यक्त करून योग्य ती उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप पीडित करीत आहेत.

Fire Fighters trying to get Control
Fire Fighters trying to get Control

  मात्र झालेल्या नुकसानाची भरपाई महावितरणने संबंधित आदिवासी बांधवांना त्वरित द्यावी व संबंधित महावितरण कंपनीच्या उपविभागीय उपकार्यकरी अभियंता व कर्मचारी यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सभापती धुमाळ यांनी वरिष्ठ स्तरावर केली आहे. त्यामुळे याबाबत नेमकी काय चौकशी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 -किशोर गायकवाड

____________________________________________


【मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा

मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

RBI Recruitment 2021 for Office Attendent





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments