मुरबाड | अन् त्या घुसखोर वानराची केली जंगलमध्ये रवानगी... | Shabd Mashal - (KISHOR K. GAIKWAD)

मुरबाड | अन् त्या घुसखोर वानराची जंगलमध्ये केली रवानगी...

Wild Monkey

(KISHOR K. GAIKWAD)

मुरबाड (दि. १४) : मुरबाड (Murbad) तालुक्यातील मोहरई पाडा येथील राहत्या घरात चक्क एका वन्य माकडाने शिरकाव केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत घटनास्थळी धाव घेऊन सदर माकडाला पुन्हा रानात रवाना केले आहे.

Angry Wild Monkey Trying to Attack

  अन्न, पाणी यांच्या शोधार्थ अनेकदा वन्य जीव मानवी वस्तीपर्यंत येत असतात. यावेळी मानव आणि प्राणी यांच्यामध्ये होणाऱ्या संघर्षाच्या घटना नेहमीच कानावर येत असतात. अशीच एक घटना मुरबाड तालुक्यातील मोहरई पाडा येथे घडली आहे.

  काल दुपारच्या सुमारास रानटी वानर प्रजातीतील एका माकडाने शेतकरी यादव शंकर चौधरी यांच्या राहत्या घरात घुसखोरी केल्याची माहिती फोनद्वारे वनपाल रामूदादा खोडका यांना प्राप्त झाली. त्यानुसार खोडका यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर वानराला सुरक्षितपणे रानाच्या दिशेने रवाना केले. त्यामुळे अनपेक्षितपणे होणारा अनुचित प्रकार घडण्यापासून टळला.

Forest Office, Murbad (East)

  मात्र रानात हल्ली वणवे लागण्याच्या घटनेंत वाढ होत असल्याने असे वन्य प्राणी आपला जीव वाचविण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. परिणामी वन्य प्राणी आणि मानव यांच्या संघर्ष वाढत आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात याबाबत नियोजन होऊन योग्य मार्ग निघणे अपेक्षित आहे.

Ramu Khodka, Forest 

(किशोर गायकवाड)

____________________________________________

【मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा

मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

RBI Recruitment 2021 for Office Attendent




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments