चिंताजनक : मुरबाडच्या वन्य संपत्तीला वणव्याचे ग्रहण [SHABD MASHAL - KISHOR GAIKWAD]

चिंताजनक : मुरबाडच्या वन्य संपत्तीला वणव्याचे ग्रहण!

Fire in Forest at Murbad
Forest Fire at Murbad

मुरबाड : (किशोर गायकवाड) : तालुक्यातील जंगलांना जणू वणव्यांचा शापच लागल्याचे भासत असून शेकडो हेक्टरमधील वन संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे.

Fire in Forest at Murbad
Bush Fire in Forest destroys habitats of wildlife

Fire in Forest at Murbad
Fire in Forest destroyed wild plants

 तालुक्यात वणव्याचे प्रमाण वाढत चालले असून रोजच कुठे ना कुठे वणवा लागून मोठ्याप्रमाणात वनसंपदा जळून खाक होत आहे. मागील महिन्यात अशाचा एका वणव्यामुळे अस्कोत येथील आदिवासींची दोन घरे जळून खाक झालती. यात एक बकऱ्याचा होरपळून मृत्यू झालता. तर नुकताच गुरुवारी मासले बेलपाडाच्या संतवाडी येथे अशाच एका भीमकाय वणव्याने तेथील आदिवासी कुटुंबांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले होते. यात गुरांचा गोठा, पेंढा जाळून खाक झाला आणि एका जनावराचा होरपळून मृत्यू झाला व अन्य जनावर पूर्णपणे भाजून निघाले. 

Fire in Forest at Murbad
Animal died due to fire in forest 

Fire in Forest at Murbad
Local animal got seriously Injured due to fire

  काही दिवसांपूर्वी दुपारच्या दरम्यान पवाळे रान परिसरात अशाच एका महाकाय वणव्याने उग्र रूप धारण केले होते. येथील वन कर्मचारी गणेश रावते यांनी घटनास्थळी धाव घेऊन वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Fire in Forest at Murbad
Ganesh Ravte (forest guard) trying to control the forest fire

  मात्र असे वणवे लागतातच कसे? दर वर्षी लाखों रुपये खर्च करून वन विभाग वणव्यां संदर्भात प्रबोधन करीत असतो. जनमानसांत वनां प्रति जिव्हाळ्याची भावना निर्माण व्हावी व वन संरक्षण ही प्रत्येकाने आपली प्राथमिक नैतिक जबाबदारी मानली पाहिजे, या हेतूने अनेक सामाजिक संघटना काम करीत आहे. असे असतांना तालुक्यातील वणव्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत असून लाख मोलाची वन्य संपदा यात जाळून खाक होत आहे. तर वन्य प्राणी, पक्षी होरपळून नाहक बळी जात आहेत. 

 मुरबाड तालुक्यात लागणारे वणवे हे बहुतांशी मानव निर्मित असल्याचे दिसून येत असून अज्ञात वन माफिया तसेच विकृत प्रवृत्तीची मानसिकता असलेली दृष्ट माणसे आपल्या स्वार्थासाठी असे वणवे रानात लावत असल्याची चर्चा सर्वश्रुत असून वन अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत सामान्य नागरिकांनी यावर गंभीरपणे लक्ष देणे अपेक्षित आहे. वन्य जीवांची हानी होता होता आता थेट या वणव्यांमुळे मानवी जनजीवन ही धोक्यात आल्याने वन विभागापुढे तालुक्यातील हे वणवे नियंत्रणात आणणे मोठे आव्हान ठरले आहे.

(किशोर गायकवाड)

____________________________________________

मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा

मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

RBI Recruitment 2021 for Office Attendent




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments