ब्रेकिंग : मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

मुरबाड (दि. ५) : मुरबाड एम. आय. डी. सी. मधील मोरेश्वर प्लास्टिक या कंपनीला भीषण आग लागली असून यात मोठ्याप्रमाणात मालाचे नुकसान झालेले दिसून आले.
मुरबाड शहरा लगत असणाऱ्या मोरेश्वर प्लास्टिक या फोटोफ्रेम बनविणाऱ्या कंपनीला आज दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने धुरांचे उंचच उंच डोंब दूर दुरून पाहायला मिळाले. तर आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले.
शुक्रवार निमित्त आज मुरबाड एम. आय. डी. सी. बंद असतांना ही आग लागली कशी? असा सवाल निर्माण झाला असून या संशयास्पद आगीची चौकशी व्हावी, अशी मागणी कामगार वर्गाकडून केली जात आहे.
(किशोर गायकवाड)
____________________________________________
【मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा】
【मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग】
【RBI Recruitment 2021 for Office Attendent】






0 Comments