टेंभरे ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास कायम!
रस्त्याचे थातुरमातुर डांबरीकरण झाले; त्यात पुलाचे संरक्षण कठडे अदृश्यच!
[ KISHOR K GAIKWAD ]
【Murbad】
मुरबाड : तालुक्यातील टेंभरे (बु.) (Tembhare) गावाच्या ग्रामस्थांच्या एकमेव वाटेवर असणाऱ्या पूल मुरबाडी नदीवरील (Murbadi River) पुलाला संरक्षण कठडेच नसल्याने गावातून ये-जा करतांना नागरिकांना रोजच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र अनेक वर्षांपासून या पुलांचे संरक्षण कठडेच मोडकळल्या अवस्थेत आहेत.
लॉकडाउन प्रक्रिया शिथिल केल्यापासून जनजीवन पूर्ववत होत असतांना या मार्गावरून पुन्हा या गावकऱ्यांना जेवघेणा प्रवास कायम राहील आहे. या पुलावरून वाहन नेतांना जणू तारेवरची कसरत करीत असल्याचा धोकादायक अनुभव चालक, प्रवाशांना येतो. तीव्र उतार, शिवाय जागेवरचं वळण; यामुळे जीव मुठीत घेऊन चालकाला आपले वाहन पुलाच्या पलीकडे न्यावे लागत आहे. लवकरच या पुलांची डागडुजी होणे गरजेचे आहे. अन्यथा एखादी अनपेक्षित हानी घडण्याची दाट संभावना स्पष्ट दिसून येत आहे.
गावातून बाहेर पाडण्याकरीता हा एकमेव रहदारीचा रस्ता असल्याने गावातील शेकडो गावकरी, विद्यार्थी व चाकरमानी यांना दैनंदिन हा जीवघेणा प्रवास करण्या पलीकडे गत्यंतर नाही.
सुमारे दशक भराच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर येथील रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितणामुळे ते ही अपेक्षित झाले नाही. अनेक ठिकाणी वाहने अनपेक्षितपणे धोकादायक पध्दतीने हेलकावे खातात. तर मोरव्यांच्या ठिकाणी रस्ता खचलेला दिसून येतो. येत्या पावसाळ्या नंतर हा रस्ता पाहायला मिळतो की नाही? असे प्रश्न सदरचा रस्ता पाहतांना प्रवाश्यांना पडतो. त्यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षिततेचा विचार न करता निव्वळ शासनाचा निधी लाटण्यासाठी हा बनविला आहे की काय? असा सवाल गावकरी करीत आहेत. त्यातच या रस्त्याच्या कामाचा अंदाजपत्रक बनवितांना मुरबाडी नदीवरील या पुलाचा विचार केलेला नाही का? या निरुत्तरीत प्रश्नांमुळे गावातील नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण कायम आहे.
तर सारखीच दुरावस्था याच मुरबाडी नदीवरील मुरबाड-शहापूर मार्गावरील कुडवली नर्सरी जवळील पुलाची होतांना दिसून येत आहे. या पुलाचे दोन्ही कठडे निखळत चालले असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची खंत प्रवासी, चालक व्यक्त करीत आहेत.
![]() |
| Kudvali Nursari Bridge on Murbadi River |
"गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हा जीवघेणा प्रवास करीत आहोत. गावातील विद्यार्थी, वृद्ध या पुलावरून रिक्षातून रोजच प्रवास करीत असतात. तीव्र उतार आणि त्यात वळण, यामुळे आणखीनच भीती वाटते. शिवाय पूल ही अरुंद. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे."
-अनिल भगवान जाधव (टेंभरे ग्रामस्थ)
(7038843444)
___________________________________________








0 Comments