एल्गार : मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा


एल्गार : मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा

morcha at murbad

मुरबाड (दि. ५) : भारतीय संविधानाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सोमवारी आंबेडकरी समाजाने मुरबाड पोलीस स्टेशनला घेराव घातला असता यावेळी पोलिसांनी क्रॉस कंपलेंटची भूमिका घेतल्याने आज तालुक्यातील आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन संताप व्यक्त केला.

morcha at murbad

morcha at murbad

 मुरबाड तालुक्यातील फणसोली येथील एका इसमाने फेसबुकवर संविधानापेक्षा मनुस्मृति श्रेष्ठ असल्याच्या आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. या गैरप्रकारामुळे संतापाची लाट उसळलेल्या तालुक्यातील आंबेडकरी जनतेने मुरबाड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून संबंधित घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपीला अटक ही करण्यात आली. मात्र यात फिर्यादींवर ही गुन्हे नोंद करण्यात आल्याने संतप्त आंबेडकरी जनतेने आज मुरबाड पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयावर पायी 'संविधान सन्मान मोर्चा' काढून घोषणाबाजी करीत मुरबाड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेचा निषेध केला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. 

morcha at murbad

  मात्र आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापेक्षाही मोठ्या मोर्च्याचे आयोजन केले जाईल, असा इशारा अनेक आंबेडकरी नेत्यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.

morcha at murbad

(किशोर गायकवाड)

____________________________________________

मुरबाडमध्ये संविधान सन्मान मोर्चा

मुरबाड MIDC मधील कंपनीला भीषण आग

RBI Recruitment 2021 for Office Attendent




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments