मुरबाड : निषेध! गशीच्या रिकाम्या खुर्चीला सत्तेकाऱ्यांचा 'हार'


[ KISHOR K. GAIKWAD ]

मुरबाड : (दि. ३१) गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अर्जित गैरहजेरीचा निषेध करण्यासाठी आज मुरबाड पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून संताप व्यक्त केला.


Sabhapati Shrikant Dhumal

  अनेक दिवसांपासून अर्जित गैरहज असलेल्या मुरबाड पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कल्पना खरपाटे यांना प्रशासनाने पूर्ववत हजर राहण्याबाबत पत्रव्यवहार केला असतांना सुध्दा त्या कामावर रुजू झाल्या नाहीत. मुरबाड तालुक्याला गट शिक्षणाधिकारी उपलब्ध नसल्याने येत्या ५ सप्टेंबर रोजी येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन झाले नाही. तसेच कोरोनामुळे गांभीर्यपूर्वक परिस्थिती निर्माण झाली असतांना ही खरपाटे मॅडमला याच्याशी काहीही एक घेणेदेणे नसून त्या नेहमीच मनमानीपणे वागत असतात. त्यामुळे आज त्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालुन निषेध व्यक्त करत असल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी सांगितले. मात्र त्यांनी वेळेत हजर व्हावे अन्यथा निषेधाची दिशा बदलणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपसभापती अरुणा खाकर, श्रमजीवीचे दिनेश जाधव, रघुनाथ खाकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तर पत्रकारांना उपस्थित राहण्यासाठी थेट व्हाट्सएप द्वारे निमंत्रित करण्यात आले होते. 
 
Panchayat Samiti, Murbad
 
  मुळात मुरबाड तालुक्यात आणि पंचायत समितीवर भाजपची सत्ता असतांना ही आपल्याच कार्यालयातील अधिकारी वर्गाचा निषेध करण्याची परिस्थिती भाजप पदाधिकाऱ्यांवर ओढवल्याने हा राजकीय अपयश तालुक्यात चर्चेचा विषय बनत आहे.

 श्रीमती खरपाटे यांच्या मुलीची प्रसूती झाली असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने तिच्या बाळंतपण शुश्रूषेची अधिक खबरदारी घेण्यासाठी श्रीमती खरपाटे अर्जित रजेवर असल्याचे समजते. मात्र याप्रकरणी अधिक माहितीसाठी गट शिक्षण अधिकारी कल्पना खरपाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल फोन रिसिव्ह करण्याचे टाळले. 

______________________________________________






Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)