![]() |
| Government Hospital, Murbad |
मोठी बातमी : उपचारासाठी १० हजार रुपये घेतलेल्या शासकीय डॉक्टरला निलंबित करा - मनसेची मागणी...|Suspend government doctor who took Rs 10,000 for treatment - MNS demands...
Shocking News from Murbad Government Hospital!
मुरबाडच्या शासकीय रुग्णालयतील धक्कादायक प्रकार!
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. ३०) गेल्या चार दिवसांपासून मुरबाडमधील व्हाट्सएप ग्रुपवर फिरत असलेल्या मनसेच्या जाहिर पत्रकार परिषदेच्या मॅसेज मागचा रहस्य अखेर आज उलगडा असून मुरबाडच्या कोविड आरोग्य विभागा बाबत मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
MNS Press Conference Murbad
प्राप्त माहिती नुसार शहापूर तालुक्यातील गेगाव येथील वनिता केशव भोईर या ५६ वर्षीय महिलेला दिनांक १९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी मुरबाड शहराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भोईर यांच्या नातेवाईकांनी डॉ. फड यांना मागणीनुसार १० हजार रुपये दिल्याचे सांगितले. मात्र अवघ्या तासाभरा नंतर सदर रुग्णाची प्रकृती खालावल्याने डॉ. फड यांनी सदर रुग्ण घरी नेण्यास नातेवाईकांना सांगितले. तद्नंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी सदर रुग्णाला कळवा येथे हलविले. त्यानुसार दि. २१ ऑगस्ट रोजी केलेली स्वॅब टेस्ट दि. २२ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह येऊन दि. २३ ऑगस्ट रोजी सदर महिला रुग्ण मृत पावल्याचे मुरबाड मनसे शहर उपाध्यक्ष विलास हुमणे यांनी सांगितले.
मात्र याप्रकरणी मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या आर्थिक मागणी विरोधात मुरबाड मनसे आक्रमक झाली असून दि. २५ ऑगस्ट रोजी वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार करून डॉ. फड यांच्या निलंबनाची मागणी केल्याचा गौप्यस्फोट आज मुरबाड मनसे तर्फे आयोजित जाहिर पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला.
मात्र या घटनेतून मुरबाडच्या आरोग्य यंत्रणेचा काळाबाजार उघड झाला असून यात आणखीन कोण कोण वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी अथवा राजकीय शक्ती समाविष्ट आहेत? याबाबत मनसेने चौकशीची मागणी केली आहे. मात्र याबाबत डॉ. फड यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
( किशोर गायकवाड )
______________________________________________
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |





0 Comments