मुरबाड : शासकीय कोविड सेंटरच्या दारात चंद्राचा सरफेस |The surface of the moon at the door of the Government Covid Center Murbad| [ KISHOR K. GAIKWAD ]

Road near Murbad Covid Centre
Road near Murbad Covid Centre

मुरबाड : शासकीय कोविड सेंटरच्या दारात चंद्राचा सरफेस|The surface of the moon at the door of the Government Covid Center Murbad


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड (दि. २९) : (किशोर गायकवाड) उशिरा का होईना मुरबाड शहरात सुरू झालेला कोविड सेंटर विविध समस्यांनंतर आता नव्या समस्येच्या कचाट्यात सापडला आहे.

WATCH VIDEO : DANCING CAR AT MURBAD COVID CENTRE DUE TO POT HOLES ON ROAD




  मुरबाडमध्ये शासकीय कोविड सेंटरची मागणी होत असतांना शहरातील ट्रामा केयर सेंटरचे उद्घाटन करून त्याठिकाणी कोविड रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. मात्र येथील एकमेव रस्त्याची दुरवस्था झाल्याने तेथे खडीची कच पसरविण्यात आली होती. परंतु लवकरच ही कच पावसाने धुवून नेल्याने याठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ऍम्ब्युलन्स व अन्य वाहने येथून जातांना जणू ब्रेक-डान्स करत असल्याचे भासतात. प्रशासनाच्या सपशेल दुर्लक्षामुळे या खड्ड्यांची लांबी रुंदी वाढल्याने मुरबाडच्या शासकीय कोविड सेंटरच्या दारासमोर चंद्राच्या पृष्ठभागाचे स्वरूप आले आहे. 
  
Pot holes on Road near Covid Centre Murbad
Pot holes on Road near Covid Centre Murbad 

   मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना आणण्यासाठी बाजारपेठेतून आणि म्हसा रोड मार्गे असे दोन प्रवेश मार्ग आहेत. शिवाय अन्य रहदारीसाठी ही या रस्त्याचा उपयोग केला जात आहे. परंतु या सुमारे शंभर दोनशे मीटर रस्त्याच्या तुकड्याचे आजवर नूतनीकरण न झाल्याने नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.   
Pot holes on Road near Covid Centre Murbad
Pot holes on Road near Covid Centre Murbad (2)

   मुरबाड शहराच्या या शासकीय रुग्णालयाच्या डागडुजीसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच याठिकाणी नव्याने एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार इमारती उभारण्याचे जोरदार काम सुरू आहे. परंतु या रस्त्याबाबत शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहेत. रुग्णालय ही बाब अत्यावश्यक सेवेत मोडत असून यात रस्त्याची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये, अशी अपेक्षा असतांना ही शासनाने या रस्त्या बाबत गांभीर्य का बाळगले नाही? हा चर्चेचा विषय बनला आहे.

______________________________________________



आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments