चिंताजनक : मुरबाडमध्ये सद्या कोरोनापेक्षा ही 'हे' अस्मानी संकट ही अधिक वेगाने येत आहे...|In Murbad, this crisis are coming faster than Corona. [ KISHOR K. GAIKWAD ]

Health Departement, Murbad 

चिंताजनक : मुरबाडमध्ये सद्या कोरोनापेक्षा ही 'हे' अस्मानी संकट ही अधिक वेगाने येत आहे..|In Murbad, this crisis are coming faster than Corona.


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. ३०) मुरबाडच्या आरोग्य यंत्रणेने संपूर्ण लक्ष कोरोनावर केंद्रित केल्याने पावसाळ्यातील साथीच्या रोगांनी थैमान घातल्याचे चित्र मुरबाड तालुक्यात दिसत आहे.

  पावसाळा आला की अनेक ससाथीचे आजार डोके काढतात. त्यात बदलत्या हवामानामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता दुबळी भासते. परिणामी अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते. दूषित पाणी, कीटक, डासांचा धुडगूस, वातावरणीय बदल यांमुळे या रोगराईला पोषक वातावरण निर्माण होऊन विविध आजारांची पैदास सुरू होते. अशातच हिवताप, मलेरिया, टायफॉईडची साथ सुरू झाली असतांना शासकीय यंत्रणा गावपातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा देण्यास कुचकामी ठरली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

पहा | -शरद पवार (सामाजिक कार्यकर्ते), उमरोली ग्रामस्थ यांची प्रतिक्रिया

  तर या साथीच्या रोगांवर उपचार करण्या आधी खाजगी रुग्णालये प्रथम कोविड चाचणीचा आग्रह धरीत असल्याने, रोगापेक्षा आजार परवडला परंतु उपचार नको; अशी म्हणण्याची वेळ रुग्ण व नातेवाईकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नागरिक जरी कोरोना पासून बचावाची खबरदारी बाळगत असले तरी अन्य साथीच्या आजारांच्या कचाट्यात अलगद सापडत आहेत. याबाबत आरोग्य यंत्रणा मात्र कोरोनाची सबब मांडून हात वर करीत आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांनी ग्रस्त नागरिकांवर प्राथमिक उपचार अभावी मृत्यूला समोर जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
  
  कोरोनाच्या निमित्ताने गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक अज्ञातवासात असल्याने गावांमधील टीसीएल, धुर फवारणी व अन्य खबरदारीच्या उपाययोजना रखडल्या असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उमरोली, साखरे धारगाव तसेच धसई परिसरात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा संसर्ग पसरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तर शहरात ही या साथीच्या आजारांची झपाट्याने लागण वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने नागरिकांची कोरोनातून सुटका होण्याऐवजी थंडीतापात बळी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

(किशोर गायकवाड)
______________________________________________




आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments