![]() |
| Barvi Dam, Murbad |
सावधान : बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याच्या तयारीत!
वाचा : 'या' गावांना आता सतर्कतेचा इशारा...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड (दि. २९) : (किशोर गायकवाड) बारवी धरणाचा विसर्ग सुरू होण्याच्या तयारीत असून संभाव्य धोक्याची दाहकता टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
![]() |
| मा. जिल्हाधिकारी यांचे पत्र |
![]() |
| मा. एम.आय. डी. सी. यांचे पत्र |
मागील दोन-तीन दिवसांच्या काहीशा विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरल्याने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी धरण कोणत्याही वेळी भरून वाहण्याची शक्यता असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची संभावना लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा आपत्ती प्रशासनाने धरण क्षेत्रातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बारवी धरणात काल मध्यदुपार पर्यंत पाण्याची पातळी ७१.९५ मीटर इतकी झाली आहे. धरणातील स्वयंचलित गेट बंद करून ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर क्षमतेने पाणी साठवण करण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या पाण्याची पातळी ७२.२० ते ७२.६० मीटर पातळीवर आल्यानंतर धरणाच्या स्वयंचलित गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरु होईल. शिवाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बारवी नदी काठी असलेल्या अस्नोली, राहटोली, चोण, सांगाव, चांदप, कारंद, पिंपलोळी, चांदप पाडा, पादीर पाडा, पाटील पाडा व नदी ठिकाणच्या अन्य नागरिकांना सावध रहाण्याचा इशारा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण उपअभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांनी दिला आहे.
तसेच या काळात नागरिकांनी वाहत्या पाण्यात जावू नये व संबंधित ग्रामपंचायती, सरपंचांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सुद्धा सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या आहेत.
__________________________________________________
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |





0 Comments