कौतुकास्पद : इयत्ता ३ री च्या (E-Book) इ-बुकमध्ये शब्द मशालच्या बातमीचा सन्मान | विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जि. प शाळेची कौतुकास्पद युक्ती | SHABD MASHAL-[ KISHOR K. GAIKWAD ]

E-book(www.shabdmashal.com)

कौतुकास्पद: इयत्ता ३ री च्या इ-बुकमध्ये शब्द मशालच्या बातमीचा सन्मान 

(Admirable: Appreciate the news of Shabad Mashal in the 3rd standard e-book)

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिप शाळेची कौतुकास्पद युक्ती

(To prevent educational loss of students, Z P school admirable trick)


(पालकांनीसाठी - इयत्ता ३ री ची इ-पुस्तिका खालील लिंकवर मोफत उपलब्ध आहे.)


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (वृत्तसेवा) लॉकडाउन काळात पुस्तका अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुरबाडच्या एका जिल्हा परिषद शाळेने अनोखी कौतुकास्पद शक्कल लढवली आहे.

  मुरबाडमधील जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर २ च्या माध्यमातून नुकताच 'माझी शाळा माझे पुस्तक' या शीर्षकाचे इ-बुक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाने आपल्या पान क्रमांक ९ मध्ये शब्द मशालच्या प्रतिकृती बातमीला स्थान देऊन सन्मानित केल्याने शब्द मशाल परिवाराकडून निर्मात्यांचे धन्यवाद व्यक्त केले जात असून विद्यार्थी व पालक वर्गातून ही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले जात आहे.
 
  ठाणे जिल्हा परिषदे आणि मुरबाड पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्या प्रेरणेतून तथा मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक चिंतामण गावरी व केंद्र शाळा नंबर २ तसेच मुरबाड तालुक्यातील जगप्रसिद्ध आजीबाईच्या शाळेचे (Aajibaichi Shala) शिल्पकार योगेंद्र बांगर (Yogendra Bangar) सर, दिव्यांग शासकीय अधिकारी निमशासकीय कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव काशिनाथ राऊत सर, योगेश तेलवणे यांच्या संकल्पना व प्रयत्नांतून या संबोध आणि स्वाध्याय इ-पुस्तिकांचे संकलन आणि निर्मिती करण्यात आली आहे. इयत्ता ३ री च्या या इ-पुस्तकात गद्य, पद्य सह राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा उपदेश, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शूरवीर क्रांतिकारक, शेतीविषयक, पशुविषयक, रानफुलांची माहिती, मुरबाडी बोली भाषेचा उल्लेख अशा विविध बाबींना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुसंस्कारित जडणघडणीचा पूर्णपणे विचार केल्याचे या पुस्तकात दिसून येत आहे. 

  
  सध्या लॉकडॉनच्या काळात पुस्तके उपलब्ध होत नसल्याने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असतांना इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांना हे २० पानांचे मोफत इ-पुस्तक चांगलीच पर्वणी ठरला असून पालकांनी याचा उपयोग करावा असे आवाहन शालेय व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

E-book(www.shabdmashal.com)




E-book(www.shabdmashal.com)



( किशोर गायकवाड)
______________________________________________


अत्यंत धक्कादायक : स्वॅब न घेताच १० वर्षीय चिमुकलीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह! | Extremely Shocking: 10-year-old Corona Report Positive without taking Swab! 

मुरबाड : फवाऱ्यांनी उघडे केले कोट्यवधींच्या पाईपलाईनचे पितळ? - चौकशी तर झालीच पाहिजे..? -  [ KISHOR K. GAIKWAD ]


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)



0 Comments