निराशाजनक : मुरबाडच्या शिक्षण विभागाचा गाडा प्रभारींच्या चाकांवर... | Disappointing: Murbad Education Department's Cart on the Wheels of In-charge ... [KISHOR K. GAIKWAD]

Panchayat Samiti Murbad
Panchayat Samiti Murbad

निराशाजनक : मुरबाडच्या शिक्षण विभागाचा गाडा प्रभारींच्या चाकांवर... | Disappointing: Murbad Education Department's Cart on the Wheels of In-charge ... [KISHOR K. GAIKWAD]


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २) मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून नुकताच सभापती - उपसभापतींकडून गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा निषेध करण्यात आला असतांना याबाबत आता नवीन अपडेट्स समोर आले आहेत.

  मुरबाड शिक्षण विभागाच्या प्रभारी गट शिक्षण अधिकारी कल्पना खरपाटे यांना आपल्या कौटुंबिक कारणास्तव अर्जित रजेवर जाणे भाग पडल्याने शिक्षण विभागाचे कामकाज रखडले होते. याचा निषेध म्हणून मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ, उपसभापती अरुणा रघुनाथ खाकर यांनी श्रमजीवीचे दिनेश जाधव व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिनांक ३१ ऑगस्ट रोजी गशींच्या या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच याबाबत सभापती धुमाळ यांनी ठाणे जिल्हा परिषदच्या शिक्षण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून मुरबाडला गट शिक्षण अधिकारी हजर होण्याबाबत मागणी ही केली होती. 
Education Department Murbad
Education Department Murbad

   याप्रकरणी प्रोग्रेस होऊन विस्तार अधिकारी शिला लांबाटे यांनी मुरबाड पंचायत समितीमधील गट शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हंटले आहे. त्यामुळे मुरबाडच्या शिक्षण विभागाला तात्पुरत्या स्वरूपात गट शिक्षण अधिकारी लाभला असून मुरबाडच्या शिक्षण विभागाचा गाडा पुन्हा एकदा प्रभारींच्या चाकांवर आले आहे.

  असे असले तरी जी सबब मांडून गट शिक्षण अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला होता तथा हजर राहण्याची मागणी करण्यात आली होते तो आदर्श तालुका शिक्षक पुरस्कार कार्यक्रम भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी व्हाट्सएप द्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे एवढी खटाटोप तूर्तास व्यर्थ जाऊन निव्वळ श्रीमती खरपाटे यांच्याकडून गट शिक्षण अधिकारी पद काढून घेण्यासाठी हा राजकीय स्टंट केल्याचे बोलले जात आहे.
  
  गेल्या अनेक वर्षांपासून मुरबाड पंचायत समितीमधील शिक्षण विभागाच्या रिक्त खुर्चीला अद्याप ही जबाबदार अधिकारी मिळत नसून जिल्हा प्रशासनाच्या दबाव तंत्राने मुरबाडच्या शिक्षण विभागाचे कामकाज चालढकल पध्दतीने सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. प्रभारी गट शिक्षण अधिकारी मधुकर घोरड यांच्या नंतर गट शिक्षण अधिकाऱ्याची धुरा विस्तार अधिकारी कल्पना खरपाटे यांच्यावर लादण्यात आली होती. आणि आता तीच जबाबदारी विस्तार अधिकारी श्रीमती लांबाटे यांनी स्वीकारन्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे मुरबाडच्या शिक्षण विभागाला वर्षानुवर्षे असणारी पूर्णवेळ जबाबदार गट शिक्षण अधिकाऱ्याची प्रतीक्षा कधी संपणार? असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.


(किशोर गायकवाड)
______________________________________________



आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments