Twitter War : बॉलिवूडच्या नटीचा मुरबाडच्या तीनहात नाक्यावर निषेध..!
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. ६) बॉलिवूड अभिनेत्रीच्या वादग्रस्त ऑनलाइन पोस्ट विरोधात आज मुरबाडच्या शिवसैनिकांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
सध्या ट्विटर स्टार म्हणून चर्चेत असलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर सारख्या प्रसारमाध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि मुंबईच्या पोलीसी कारभारावर शाब्दिक ताशेरे ओढण्याचा सपाटा लावल्याच्या आरोपाची जोरदार चर्चा आहे. याचा विविध राजकीय स्तरावर निषेध होत असतांना आज मुरबाडच्या तीन हात नाक्यावर मुरबाडच्या शिवसैनिक नेत्यांनी ही फॉर्म्यालिटी म्हणून पक्षाचा प्रोटोकॉल पाळत घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केल्याचे दिसून आले. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, शहर अध्यक्ष राम दुधाळे, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, रेखा कंटे, पंचायत समिती सदस्य पद्मा पवार, तालुका महिला संघटक योगिता शिर्के, राम दळवी, धनाजी दळवी, मोहन भावार्थे सह शिवसेनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
![]() |
| Kangana Ranaut tweets |
यावेळी अभिनेत्री कंगना राणावतच्या बॅनरला चप्पला मारून महिला कमिटीने आपला संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली. तर अभिनेत्री कंगनाने संपूर्ण महाराष्ट्र व मुंबई पोलीसांची जाहीर माफी मागावी असे मत सुभाष पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
संजय जी मुझे अभिव्यक्ति की पूरी आज़ादी है
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 6, 2020
मुझे अपने देश में कहीं भी जाने की आज़ादी है ।
मैं आज़ाद हूँ । pic.twitter.com/773n8XDESI
(अभिनेत्री कंगना राणावतने नव्याने ट्विट केलेला व्हिडिओ)
______________________________________________

0 Comments