मुरबाड : फवाऱ्यांनी उघडे केले कोट्यवधींच्या पाईपलाईनचे पितळ? - चौकशी तर झालीच पाहिजे..? - [ KISHOR K. GAIKWAD ]


मुरबाड : फवाऱ्यांनी उघडे केले कोट्यवधींच्या पाईपलाईनचे पितळ? 

चौकशी तर झालीच पाहिजे..? 

 [ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड: (दि. ५) एकेकाळी भीषण पाणी टंचाईला सामोरे गेलेल्या मुरबाड शहराची पिढ्यांपिढ्यांची पाणी समस्या संपविण्यासाठी राबविण्यात आलेली कोट्यवधींची नळपाणी पुरठवा योजना पुन्हा एकदा नादुरुस्त झाल्याने मुरबाड नगर पंचायतचा सुस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे.
 
  मुरबाड नगर पंचायतच्या स्थापने नंतर सुमारे चार वर्षांपूर्वी ही योजना लागू करण्यात आली आणि मुरबाड शहर वासीयांची पाण्यासाठीची वणवण थांबली. परंतु या दरम्यान अनेकदा काही ना काही कारणाने या पाईपलाईन नादुरुस्त झाल्या. मागील काही दिवसांपासून मुरबाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बागेश्वरी तलावातून येणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने निर्माण झालेले पाण्याचे उंचच उंच फवारे दुरूनच नजरेस पडत होते. परिणामी हजारों लिटर पाणी वाया जाऊन बागेश्वरी शेजारीच नव्या पाण्याचे तळे साचले आहे. याबाबत मुरबाडचे मनविसे शहर अध्यक्ष देवेन जाधव यांनी प्रत्यक्ष या समस्येच्या ठिकाणी भेट देऊन नगर पंचायत प्रशासनाला याची माहिती दिली आहे. त्यामुळे या नळ पाणी पुरवठेच्या मेंटेनन्सकडे मुरबाड नगर पंचायतचे हल्ली दुर्लक्ष असल्याचे उघड झाले असून असेच सुस्त कारभार राहिल्यास मुरबाडकरांना पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरण्याची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  मुरबाड शहरातील या नळपाणी पुरवठा योजच्या पाईप लाईनचे भूमिगत जाळे शहराच्या ठिकठिकाणी आहेत. बाजारपेठेतील पाईप लाईवर थेट अनियोजितपणे काँक्रीट रस्ते बनवले असून यातील काही ठिकाणी पाईप लिकेज होऊन गळती लागली आहे. मात्र त्यावरील काँक्रीट रस्त्यांमुळे दुरुस्ती शक्य नसल्याचे भासत आहे. परिणामी दैनंदिन हजारों लिटर फिल्टर पाणी वाया जातांना हतबल होऊन पाहावे लागत आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेत वापरण्यात आलेले निकृष्ट पाईपांंच्या दर्जाची आणि संपूर्ण योजनेची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. सबब या सर्वांतून मुरबाड शहराचा कायापालट करतांना घाईघाईने झालेला विकास आणि त्यामुळे निर्माण झालेल्या त्रुटी आता हळूहळू समोर येत आहेत. 
(किशोर गायकवाड)
______________________________________________




आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments