![]() |
| Government Hospital Murbad |
दणका : शब्द मशालच्या 'त्या' बातमीने प्रशासनाला जाग...
![]() |
| Government Hospital Road Murbad |
रुग्णांना मिळाला निदान सोयीचा मार्ग...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १) चंद्राच्या पृष्ठभागाची उपमा देऊन शब्द मशालने मुरबाडच्या शासकीय रुग्णालया समोरी खड्ड्यांची व्यथा मांडल्यानंतर आज ते खड्डे भरलेल्या अवस्थेत नजरेस पडत आहेत.
![]() |
| Road repaired near government hospital murbad |

सुरू झाल्यापासून काहीना काही कारणास्तव वादग्रस्त चर्चेत राहिलेल्या मुरबाडमधील शासकीय कोविड सेंटरच्या दारासमोर चंद्राचे सरफेस सदृश मोठ - मोठे खड्डे पडल्याची बातमी शब्द मशालने दिनांक २९ ऑगस्ट रोजी प्रसारित केली होती. याची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सदरचे जीवघेणे खड्डे भरल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंतकुमार खांबाईत यांनी सांगितले. त्यामुळे आता याठिकाणी रुग्णांना आणण्यासाठी जी दगदग सोसावी लागत होती, ती काहीप्रमाणात कमी झाली आहे. मात्र यामार्गे रुग्णालयीन कामकाजा व्यतिरिक्त होणारी विनाकारण वाहतूक नागरिकांनी बंद करणे आवश्यक असल्याची सूचना ही डॉ. खांबाईत यांनी केली आहे.


"शासकीय रुग्णालया समोर पडलेले खड्डे पी. डब्लू. डी. विभागाशी संपर्क साधून त्यांना भरण्यात आले आहे. मात्र याठिकाणी कोविड सेंटर असल्याने नागरिकांनी विनाकारण येथील रहदारी टाळावी"
-डॉ. हेमंतकुमार खंबाईत, वैद्यकीय अधिकारी, शा. ग्रा. रु. मुरबाड
(किशोर गायकवाड)
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |




0 Comments